शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात आजी-माजी नगरसेवकांची मक्तेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : तीस वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेतील राजकारणात काहींची मक्तेदारी असल्याचे जाणवते. नवख्याला राजकारणात संपविण्याचे डाव आखले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : तीस वर्षांत इस्लामपूर नगरपालिकेतील राजकारणात काहींची मक्तेदारी असल्याचे जाणवते. नवख्याला राजकारणात संपविण्याचे डाव आखले जातात. त्यातून काहीजण कर्जबाजारी झाले आहेत, तर काहींनी पालिकेचा नादच सोडला आहे. आगामी निवडणुकीत आजी-माजी नगरसेवकांची मक्तेदारी आणि तेच-तेच चेहरे पाहावयास मिळण्याची चिन्हे आहेत.

आगामी निवडणुकीसाठी सत्ताधारी विकास आघाडीकडे आता खमके नेतृत्व राहिलेले नाही. तरीसुद्धा विकास आघाडीची जुळवाजुळव झाली, तर यामध्ये प्रामुख्याने विक्रम पाटील, विजय कुंभार, वैभव पवार, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, महेश पाटील, सुप्रिया पाटील, चेतन शिंदे, एल. एन. शहा यांच्यासह नगराध्यक्ष निशिकांत पाटील या सर्वांना एकत्रित करण्यात यश येणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

राष्ट्रवादीमध्येही वेगळी परिस्थिती नाही. माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांच्या निधनानंतर शहरातील राष्ट्रवादीला नेतृत्व नाही. त्यामुळे जयंत पाटील हेच नेतृत्व मानून सध्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. डॉ. संग्राम पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, विश्वास डांगे, शहाजी पाटील, संदीप पाटील, खंडेराव जाधव, मनीषा पाटील, पीरअली पुणेकर, संजय कोरे, दादा पाटील, आनंदराव मलगुंडे, सुनीता सपकाळ, सुभाष सूर्यवंशी, बाबा सूर्यवंशी आदी आजी-माजी नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेची अवस्था बिकट आहे. महाआघाडी असल्याने जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, सीमा पवार आणि शकील सय्यद यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आजी-माजी नगरसेवकांची मक्तेदारीच दिसून येणार आहे.

चौकट

जशास तसे उत्तर

गत निवडणुकीवेळी युतीचे शासन होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यंत्रणेचा वापर करूनच राष्ट्रवादीवर मात केल्याची चर्चा आहे. आता महाआघाडीचे सरकार आहे. आगामी निवडणुकीपर्यंत ते टिकल्यास राष्ट्रवादीकडून यंत्रणेवर दबाव टाकून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोगो- इस्लामपूर पालिका