शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत मोकाट कुत्र्यांचा हल्ला; आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:22 IST

मिरज : मिरजेत शास्त्रीनगर, साठेनगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी गुरुवारी चावा घेऊन चार बालकांसह आठजणांना जखमी केले. याबाबत तक्रार करूनही मोकाट कुत्र्यांंच्या बंदोबस्ताकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी मोकाट कुत्र्याला ठार मारून, ते मृत कुत्रे महापालिकेतील आरोग्य अधिकाºयांच्या टेबलवर आणून ठेवले व प्रशासनाचा निषेध केला.मिरजेत शहरभर वावरणाºया मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना उपद्रव सहन ...

मिरज : मिरजेत शास्त्रीनगर, साठेनगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी गुरुवारी चावा घेऊन चार बालकांसह आठजणांना जखमी केले. याबाबत तक्रार करूनही मोकाट कुत्र्यांंच्या बंदोबस्ताकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी मोकाट कुत्र्याला ठार मारून, ते मृत कुत्रे महापालिकेतील आरोग्य अधिकाºयांच्या टेबलवर आणून ठेवले व प्रशासनाचा निषेध केला.मिरजेत शहरभर वावरणाºया मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना उपद्रव सहन करावा लागत आहे. गुरुवारी शास्त्रीनगर व साठेनगर येथे मोकाट कुत्र्याने अथर्व भोरे (वय ४), अनिकेत सुभाष गोसावी (७), सागर चन्नाप्पा कांबळे (१०), महंमद शेख (६), यश भोसले (६) या बालकांसह आठजणांना चावा घेऊन जखमी केले. कुत्र्यांच्या हल्ल्यातील जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे शास्त्रीनगर, साठेनगर, पवार गल्ली परिसरातील नागरिकांनी आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी दखल न घेतल्याने, एका कुत्र्याला ठार मारून ते मृत कुत्रे महापालिका कार्यालयात नेऊन आरोग्य अधिकाºयांच्या टेबलवर टाकले.जिल्हा सुधार समितीचे तानाजी रूईकर, मुकुंद भोरे, नितीन मोरे, रामदास भोरे, ओंकार भोरे, प्रकाश कवाळे, राहुल भोरे, पप्पू भोरे, नंदा भोरे, सुलोचना भोरे, दीपा भोरे, रोहित कांबळे, अवधूत कांबळे, अजिंक्य भोरे यांच्यासह नागरिकांनी महापालिका आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध केला. लोकांच्या तक्रारी वाढल्यानंतरच काही काळापुरती कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मोहीम राबविली जाते. त्यानंतर पुन्हा सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष केले जाते. मोकाट कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली आहे.