शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 शेतकऱ्यांचा सात-बारा हडप करण्याचा मोदींचा डाव: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:18 IST

शिरटे : नरेंद्र मोदी संपूर्ण कर्जमाफी करून आमच्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करतील, या आशेने आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मात्र ...

शिरटे : नरेंद्र मोदी संपूर्ण कर्जमाफी करून आमच्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करतील, या आशेने आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मात्र शेतकºयांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालून त्यांचा सात-बारा हडप करण्याचा डाव रचला होता, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केला.रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील जाहीर सभेत ते, आपण भाजप-शिवसेना विरोधी भूमिका का घेतली, यामागची पार्श्वभूमी सांगताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, विजय पाटील, बी. डी. पवार, दिलीपराव मोरे, दामाजी मोरे, दादासाहेब मोरे, जि. प. सदस्य धनाजी बिरमुळे, सरपंच कुमार कांबळे, नीलेश पवार, सुजीत मोरे, अ‍ॅड. विवेकानंद मोरे, जयवंत मोरे, उमेश पवार उपस्थित होते. खा. शेट्टी यांच्या वाळवा तालुक्यातील ताकारी, साखराळे, बहे, कि. म. गड, शिरटे, नरसिंहपूर गावात प्रचार सभा झाल्या.खा. शेट्टी म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी व शेतकºयांना दीडपट हमीभाव देण्याचा विश्वास दिल्याने आम्ही त्यांना साथ केली; मात्र त्यांनी सत्तेवर आल्यानंतर आपले खरे रूप दाखविले. प्रथम त्यांनी सुप्रीम कोर्टात असा हमीभाव देता येणार नाही, असे लिहून दिले. त्यानंतर जमीन अधिग्रहण कायद्यात शेतकरीविरोधी भूमिकोचा घाट घातला. अशा विश्वासघातकी मोदी व त्यांच्या पक्षास साथ कशी करायची? मला जायचे होते देवाच्या आळंदीला, मात्र पोहोचलो चोरांच्या आळंदीस! मी तुमच्या भरवशावर त्यांना अंगावर घेतले आहे. मला एकाकी पाडू नका. पुन्हा एकदा त्यांच्या छाताडावर नाचण्यासाठी मोठ्या मताधिक्याने दिल्लीस पाठवा.या दौºयात राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम पाटील, संजय पाटील, सौ. सुस्मिता जाधव, काँग्रेस पक्षाचे नंदकुमार शेळके, प्रताप मोरे, संदीप जाधव, स्वाभिमानी संघटनेचे सयाजी मोरे, संदीप राजोबा सहभागी होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक