शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना उद‌‌्ध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:27 IST

सांगली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवनसमोर शुक्रवारी उपोषण आंदोलन झाले. त्यामध्ये कृषी ...

सांगली : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवनसमोर शुक्रवारी उपोषण आंदोलन झाले. त्यामध्ये कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील, मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील आदी सहभागी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे असल्यामुळे त्वरित रद्द करावेत, अशी मागणी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली. कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी संघटनांच्या भारत बंदला पक्षाने उपोषणाच्या माध्यमातून पाठिंबा दिला.

कॉंग्रेस भवनसमोर आंदोलनाचे नेतृत्व डॉ. कदम यांच्यासह आमदार मोहनराव कदम, काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, शैलजा पाटील, विशाल पाटील, पक्षाचे निरीक्षक सचिन नाईक, जितेश कदम आदींनी केले.

डॉ. कदम म्हणाले, कृषी कायद्यांवर कोणतीही चर्चा न करता भाजप सरकारने जबरदस्तीने मंजूर केले. कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर लाखो शेतकरी चार महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. सरकारने त्यांच्याशी चर्चेचे नाटक केले; पण कायदे मागे घेतले नाहीत. तीनशेहून अधिक शेतकरी शहीद झाले, त्याचीही दखल घेतली नाही. शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे.

आंदोलनात पै. नामदेवराव मोहिते, उपमहापौर उमेश पाटील, मंगेश चव्हाण, बाळासाहेब गुरव, आप्पासाहेब पाटील, आशा पाटील, वहिदा नाईकवडी, दिलीप पाटील, अजित भोसले, अजित ढोले, अजित शिरगावकर, सुभाष खोत, सदानंद जवळगे, सुवर्णा पाटील, मालन मोहिते, वैशाली वाघचौरे, बिपीन कदम, अण्णासाहेब कोरे, संजय मेंढे, वसीम रोहिले, प्रताप चव्हाण, शुभांगी साळुंखे, फिरोज पठाण, आरती वळवडे, मनोज सरगर, अमर निंबाळकर, संतोष पाटील, प्रशांत पाटील, ताजुद्दीन तांबोळी, सनी धोत्रे, अयुब निशाणदार आदी सहभागी झाले.

चौकट

भाजप नेत्यांची कटकारस्थाने

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजपचे नेते कटकारस्थान करत आहेत. फोन टॅपिंगचे प्रकरण त्याचाच एक भाग आहे. महागाई, गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्याऐवजी नसते उद्योग चालवले आहेत. काहीही करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी खटाटोप सुरू आहे.