शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

समविचारी संघटनांनी एकत्र यावे: मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:18 IST

आळसंद : देशात ३१ टक्के मतांच्याआधारे आपल्यावर अगडबंब राजकीय सत्ता थोपवली आहे. या सत्तेला आव्हान द्यायचे असेल, तर समविचारी संघटनांनी हातात हात घालून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.बलवडी (भा., ता. खानापूर) येथील क्रांती स्मृती वनात भाई संपतराव पवार यांच्या ‘आत्मचरित्र ...

आळसंद : देशात ३१ टक्के मतांच्याआधारे आपल्यावर अगडबंब राजकीय सत्ता थोपवली आहे. या सत्तेला आव्हान द्यायचे असेल, तर समविचारी संघटनांनी हातात हात घालून एकत्र येण्याची गरज आहे, असे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.बलवडी (भा., ता. खानापूर) येथील क्रांती स्मृती वनात भाई संपतराव पवार यांच्या ‘आत्मचरित्र मी लोकांचा सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पेणचे आमदार भाई धैर्यशील पाटील होते. यावेळी डॉ. राजन गवस, ललित बाबर, भाई संपतराव पवार, सौ. विजया पवार, आनंद अवधानी उपस्थित होते.पाटकर म्हणाल्या, चळवळीला पूरक असे काम संपतराव पवार व त्यांच्या विचारकांनी केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच राजकीय, सामाजिक, आर्थिक यावर भाष्य करणारे आत्मचरित्र आहे. याचा अनुभव लोेकलढ्याशी नाळ जोडणारा आहे. धरणामुळे विकास संपत असेल, विकासाचा तंत्र-मंत्र किती विकृत झाला आहे. विकृतीचा आधार घेत राजकारण करत आपल्या मतांच्या बॅँका भरून घेतल्या जात आहेत. आज वाटचाल अराजकतेकडे चालू आहे. शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांच्या सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. जो कष्टकरी व श्रमिक आहे, त्याला स्थानही नाही व दामही नाही. त्यामुळे असे घडत आहे. हा देश विचारशील, संवेदनशील असूनही, आत्महत्यांनी असंवेदनशील बनला आहे. महाराष्टÑातील एकूण धरणांपैकी मोठी धरणे आठ टक्क्यांपेक्षाही जास्त भरली नाहीत, हे वास्तव आहे.राजन गवस म्हणाले, या पुस्तकात समाजाचे मानसशास्त्र मांडले आहे. मराठी माणसाच्या अंतरंगातील गुंते आणि पेच, डाव्या चळवळीच्या अपयशाचे तर्क शास्त्र, आधुनिकता व द्वंद्वनिष्ठता, जगण्याची तत्त्वनिष्ठता सांगितली आहे.आमदार धैर्यशील पाटील म्हणाले, चळवळी या राज्याला दिशा देण्याचे काम करतात. कायदे हे संसदेत होत नाहीत, ते रस्त्यावरील चळवळीतूनच होतात. सेझ धोरण किती फसवे आहे, हे रायगडमध्ये शेकापने केलेल्या आंदोलनामुळे दिसून येते. सेझ धोरण स्वीकारले असते, तर देशाचे वाटोळे झाले असते.अ‍ॅड. संदेश पवार यांनी स्वागत केले. यावेळी राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, महिला राष्टÑवादीच्या अध्यक्षा छाया पाटील, ‘क्रांती’चे अध्यक्ष अरूण लाड, अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, डॉ. बाबूराव गुरव, डॉ. इंद्रजित मोहिते, सरपंच प्रवीण पवार, डी. के. गायकवाड, व्ही. वाय. पाटील, रवींद्र बर्डे, डॉ. अमोल पवार, मानसिंग बॅँकेचे संस्थापक जे. के. (बापू) जाधव, पापा पाटील उपस्थित होते. अनिल पाटील यांनी आभार मानले, तर प्रा. प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन केले.पारंपरिक स्वागताने उपस्थित भारावले..क्रांती स्मृती वनात आयोजित करण्यात आलेल्या ‘मी लोकांचा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थितांना शेंगा व गूळ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यामुळे उपस्थितांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.