शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मिरज चोरीतील अडीच लाखांचे मोबाईल हस्तगत

By admin | Updated: January 24, 2016 00:44 IST

तिघांना अटक : दुकान फोडणारे चोरटे सांगलीतील; दोन महिन्यांत सहा गुन्हे उघडकीस

 मिरज : मिरजेत स्कायलाईन मोबाईल शॉपी फोडून लाखो रुपये किमतीचे मोबाईल चोरणाऱ्या सांगलीतील तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. तीन चोरट्यांकडून अडीच लाख रुपये किमतीचे ३४ मोबाईल हस्तगत करण्यात आले. अजय बापू कांबळे, (वय १८), पवन धर्मेंद्र साळुंखे (१८), बापू दिलीप काळे (२५, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली) अशी चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत सहा मोठे गुन्हे उघडकीस आणल्याचे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले. जवाहर चौकात स्कायलाईन मोबाईल शॉपीची कुलपे तोडून चोरट्यांनी दुकानातील शोकेसमधील सॅमसंग, नोकिया, मायक्रोमॅक्स, सोनी, कार्बन यासह नामवंत कंपन्यांचे सुमारे साडेतीन लाख किमतीचे ७५ किमती मोबाईल घेऊन पलायन केले होते. चोरट्यांनी स्मार्ट फोनसह दुकानातील सीसी टीव्हीचे चित्रण होणारे डीव्हीआर मशीनही चोरून नेले. याप्रकरणी दुकानमालक संदेश वाघमारे यांनी फिर्याद दिली होती. शहरात भरवस्तीतील दुकान फोडून लाखोचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला आव्हान दिले होते. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकातील योगेश पाटील, प्रशांत कोळी, सागर आंबेवाडीकर, श्रीपाद शिंदे, बसवराज शिरगुप्पे यांना सांगलीत बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी आवास येथे काहीजण चोरीचे मोबाईल स्वस्तात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. चोरीचे मोबाईल विक्री करणाऱ्या तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी मिरजेत दुकान फोडून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तिघेही बांधकामावर मजुरी, सेंट्रींग अशी किरकोळ कामे करणारे आहेत. त्यांनी यापूर्वी चोऱ्या, घरफोड्या केल्या आहेत काय, याची खात्री करण्यात येत आहे. चोरट्यांकडून सुमारे अडीच लाख किमतीचे ३४ मोबाईल हस्तगत करण्यात आले. गेल्या दोन महिन्यात पोलिसांनी एरंडोलीतील दुकानफोडी, ट्रॅक्टर चोरी, वकिलाची मोटार चोरी, इराणी टोळीकडून दागिने चोरी असे सहा मोठे गुन्हे उघडकीस आणून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे उपअधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)