शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

एलबीटीविरोधात मनसेने घातला धुडगूस

By admin | Updated: June 11, 2014 01:03 IST

गटबाजी चव्हाट्यावर : कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, पोलिसांकडून चौघांना अटक

सांगली : एलबीटीविरोधी आंदोलनावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली. मनसेच्या व्यापारी सेनेने एलबीटी कार्यालयात धुडगूस घालत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी व्यापारी सेनेचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांच्यासह चारजणांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी सेनेच्या आंदोलनानंतर थोड्याच वेळात माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या गटाने कार्यालयासमोर निदर्शने केली. एलबीटीविरोधात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्यावतीने निदर्शने केली जाणार होती. त्याची कुणकुण लागताच व्यापारी सेनाही जागी झाली. शिंदे यांच्या आंदोलनापूर्वीच व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र शहा हे सात ते आठ कार्यकर्त्यांसह स्टेशन चौकातील एलबीटी मुख्यालयात आले. आंदोलनामुळे कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. शहा व अन्य कार्यकर्त्यांनी हातोडा, गजाच्या सहाय्याने लोखंडी जाळीचे प्रवेशद्वार तोडले. त्यानंतर कार्यालयात घुसून टेबल, खुर्च्या फेकून दिल्या. अचानक झालेल्या या हल्ल्याने एलबीटी कार्यालयातील कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले. काही कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. धक्काबुक्कीचे वृत्त समजताच शहर पोलीस घटनास्थळी धावले. पोलिसांना पाहून काही आंदोलकांनी पलायन केले, तर जितेंद्र शहा, विनोद शेलार, सदाशिव कबाडे, केतन कांबळे यांना अटक करण्यात आली. एलबीटी अधीक्षक एस. जी. मुजावर यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. दरम्यान, व्यापारी सेनेचे आंदोलन संपल्यानंतर माजी आमदार नितीन शिंदे, अ‍ॅड. स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एलबीटी हटावसाठी मोर्चा काढून निदर्शने केली. शासनस्तरावर निर्णय होईपर्यंत महापालिकेने जप्तीची कारवाई करू नये, कर तातडीने रद्द करावा, महापालिका कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात आदित्य पटवर्धन, सुनीता इमानमदार, प्रियानंद कांबळे, बाजीराव गस्ते, लीना सावर्डेकर, वनीता मौर्य, विजय मौर्य, चेतन भोसले आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)