शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मनसे पुन्हा विकास आघाडीच्या नादाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : गत पालिका निवडणुकीत नानासाहेब महाडिक यांच्या शब्दामुळे मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे यांनी निवडणुकीतून माघार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : गत पालिका निवडणुकीत नानासाहेब महाडिक यांच्या शब्दामुळे मनसेचे शहराध्यक्ष सनी खराडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. परंतु स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीसमयी त्यांना डावलले. आगामी निवडणुकीत मनसे पुन्हा विकास आघाडीत सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

पालिकेतील पक्षप्रतोद विक्रमभाऊ पाटील आणि सनी खराडे यांनी एकत्रित येऊन इस्लामपुरात वाहनधारकांसाठी पासिंग ट्रॅक झाला नाही, तर तहसील कार्यालयावर घेराव घालून बंद पाडू, असा इशारा दिला आहे. ही भूमिका आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याची चर्चा आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीसमयी खराडे यांच्यावर अन्याय झाल्याचा मनसेतून आरोप आहे.

इस्लामपूर शहरात ४०० हून अधिक अधिकृत रिक्षा आहेत. त्यातच विक्रमभाऊ पाटील यांनी यापूर्वी वडाप संघटनेचे नेतृत्व केले आहे. यामुळेच सनी खराडे यांनी पाटील यांची साथ घेऊन रिक्षा संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातूनच आगामी पालिका निवडणुकीत मनसे आपली ताकद अजमावणार आहे. वाळवा तालुका अ‍ॅटो रिक्षा चालक-मालक संघटनेची स्थापना माजी नगराध्यक्ष चंद्रकांत खराडे यांनी केली आहे. हीच संघटना सनी खराडे चालवत आहेत. इस्लामपूरसह वाळआ तालुक्यातील वाहनधारकांकडून कररूपाने परिवहन खात्याकडे (आरटीओ) वर्षाकाठी १० कोटीहून अधिक रक्कम जमा होते. त्यामुळे इस्लामपूर येथे विभागीय कार्यालय व्हावे, ही मागणी पूर्वीपासूनच आहे. परंतु याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने भाजप आणि मनसे एकत्रित येऊन लढा देण्याच्या तयारीत असले तरी, त्यांचा मुख्य उद्देश आगामी पालिका निवडणुकीचे रणांगण आहे.

कोट

रिक्षा संघटना राजकारणविरहित आहे. विकास आघाडीने दिलेले शब्द पाळले नाहीत. वाहनधारकांसाठी पार्सिंग आणि नवीन लायसन्ससाठी इस्लामपूूर येथे उपप्रादेशिक कार्यालय होण्याची मागणी वारंवार करूनही याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच विक्रमभाऊ पाटील यांना घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

- सनी खराडे, शहराध्यक्ष, मनसे

फोटो - १८०२२०२१-आयएसएलएम-राजकीय न्यूज

विक्रमभाऊ पाटील सनी खराडे