शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी दुष्काळप्रश्नी नेतृत्व करावे

By admin | Updated: October 24, 2015 00:22 IST

मानसिंगराव नाईक : विश्वास कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ

शिराळा : शिराळा तालुक्यात यावर्षी मोठा दुष्काळ आहे. मात्र शासनाने दुष्काळ जाहीर केलेला नाही. आता शेतकरी वर्गासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दुष्काळाचे सर्व निकष येथे लावावेत. यासाठी लढा उभा करण्याची वेळ आली आहे. विद्यमान आमदारांनी या लढ्याचे नेतृत्व करावे. शिवाजीराव देशमुख यांच्यासह मी स्वत: या लढ्यात उतरेन, असे प्रतिपादन माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्याहस्ते काटापूजन व गव्हाणीत ऊस मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.अध्यक्ष नाईक म्हणाले, तालुक्याच्या इतिहासात एवढा मोठा दुष्काळ प्रथमच पडला आहे. याअगोदर या तालुक्याने कधीही दुष्काळासाठी मदत मागितली नाही. त्यामुळे आपला पहिला हक्क आहे. चुकीची आणेवारी व शासनाचे धोरण यामुळे दुष्काळाचे निकष या तालुक्यास मिळाले नाहीत. चांदोली धरणातही पाणीसाठा पुरेसा नाही. तरीही वाकुर्डे योजना कार्यान्वित करुन तलाव, धरणे भरून घ्यावीत.विश्वास साखर कारखान्याचे खासगीकरण करण्याचा कोणताही पापदायक विचार आपल्या मनात आलेला नव्हता आणि येणारही नाही. त्यामुळे या कारखान्याच्या विकासाला बाधा येईल असे कृत्य कोणीही करु नये, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी सर्जेरावदादा बँकेचे अध्यक्ष हंबीरराव नाईक, उदयसिंगराव नाईक, शिवाजीराव घोडे—पाटील, पं. स. उपसभापती सम्राटसिंह नाईक, रणजितसिंह नाईक, युवराज गायकवाड, दिनकरराव पाटील, बाबासाहेब पवार, कार्यकारी संचालक राम पाटील, भीमराव गायकवाड, विकास कदम, शंकरराव नांगरे, प्रमोद नाईक, अशोकराव पाटील उपस्थित होते.विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. अशोकराव कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. हंबीरराव पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)दुष्काळी मदत : पहिला हक्क आमचायावेळी मानसिंगराव नाईक म्हणाले की, आजवर शिराळा तालुक्यातील जनतेने कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा केलेली नव्हती, त्याची गरजही कधी भासली नाही. पण यंदा स्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांना खरोखर मदतीची गरज आहे. आजवर आम्ही कधीही मदत घेतली नाही, त्यामुळे दुष्काळासाठीच्या मदतीवर पहिला हक्क आमचा आहे.‘आंदोलकांनी’ स्वत: किती दर दिला?विश्वास कारखान्याने गेल्या १0 ते १२ वर्षात सतत चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. सहवीज निर्मिती, डिस्टिलरी, कार्बनडाय आॅक्साईड फिलिंग या प्रकल्पांमुळे या कारखान्याचा विकास दर चढता आहे. नामांकित कारखान्यांपेक्षाही जादा ऊस दर दिला आहे. येथील विरोधक शेतकरी संघटनेचा झेंडा घेऊन ऊस दरासाठी आंदोलन करीत होते. त्यांनी स्वत:च्या कारखान्याकडून किती ऊस दर दिला आहे? कामगार, वाहतूक कंत्राटदार, तोडणी कामगार यांचेही पैसे दिलेले नाहीत, अशी टीका नाईक यांनी केली.