शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या निधीत आमदार, खासदारांचा हस्तक्षेप

By admin | Updated: December 3, 2015 23:55 IST

‘नियोजन’चा निधी रोखला : सभापतींसह नगरसेवक मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

सांगली : महापालिकेला शासनाकडून मिळणाऱ्या विविध निधीत आता भाजपच्या आमदार, खासदारांनी हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेकडून दर्जेदार कामे होत नसल्याचे सांगत पालिकेच्या निधीतील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यासाठी महापालिकेच्या ठरावाची गरज आहे. बांधकाम विभागाकडूनच कामे करणार असाल, तर आमच्या ठरावाची गरजच काय?, असा सवाल स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी केला आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी सभापती पाटील यांच्यासह नगरसेवक जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची भेट घेणार आहेत. शहरातील विकासकामे महापालिकेमार्फत केली जातात. आजअखेर या विकास कामांत लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केलेला नाही. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जिल्हा नियोजन समितीतून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. या निधीत पालिकेचा हिस्सा घालून विकासकामे करण्यात आली. ही सर्व कामे पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत झाली. त्यात कधीच वाद झाला नाही. पण आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महापालिकेला नव्या नियमांना तोंड द्यावे लागत आहेत. त्यात पालिकेत काँग्रेसची सत्ता असल्याने भाजपचे आमदार व खासदारांचा विकास कामांतील हस्तक्षेप वाढला आहे. जिल्हा नियोजन समितीतून मागासवर्गीय व दलित वस्तीसाठी पाच कोटीचा निधी आला आहे. या निधीतून करावयाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहेत. तसे आमदार व खासदारांनी सुचविले आहे. त्यासाठी महापालिकेचा ठराव देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यास पालिकेचीही हरकत नाही. पण कामाचे प्राधान्य कोण ठरविणार? हा प्रश्न आहे. आमदार, खासदार व त्यांच्या समर्थकांना वाटणारी कामे या निधीतून करावयाची, की नगरसेवकांनी सुचविलेली कामे करायची, यावर वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या नगरसेवकांची कामे होणारच नसतील, तर आमचा ठराव कशासाठी हवा? तुम्हीच कामे निश्चित करा व निधी खर्च करा, असा पवित्रा सभापती संतोष पाटील व नगरसेवकांनी घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे करून घेण्यासही सभापतींनी हरकत घेतलेली नाही. पण महापालिका सुचवेल ती कामे होणार असतील, तर आक्षेप नाही, असा मुद्दाही त्यांनी बोलताना मांडला. यासाठी मंगळवारी सभापती पाटील, नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. (प्रतिनिधी)निधी पालिकेचा : कामे बांधकामकडेमहापालिकेकडून दर्जेदार कामे होत नसल्याचे सांगत पालिकेच्या निधीतील कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करवून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यासाठी महापालिकेच्या ठरावाची गरज आहे. बांधकाम विभागाकडूनच कामे करणार असाल, तर आमच्या ठरावाची गरजच काय?, असा सवाल स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांनी केला आहे. निधी महापालिकेचा आणि कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्याचा आमदार, खासदारांचा अटास कशासाठी, असाही त्यांनी सवाल केला आहे.