शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनामुळे सध्या सण, उत्सवांवर निर्बंध आले आहेत. पण सोशल मीडियावर मात्र सणाचा उत्साह कायम आहे. त्यात जिल्ह्यातील आमदार- खासदारांनी यंदा सोशल मीडियावर सण साजरे केले. फेसबुक, ट्विटरवरून रक्षाबंधन, कृष्णजन्माष्टमी, मोहरम, पारशी दिनाच्या शुभेच्छाही आनलाइन दिल्या. शिवाय कोरोनात काळजी घेण्याचे आवाहनही केले.
चौकट
खासदारही ट्विटरवर ॲक्टिव्ह
सांगलीचे खासदार संजयकाका पाटील हे ट्विटरवर सर्वाधिक ॲक्टिव्ह असतात. केंद्र सरकारच्या निर्णयापासून ते स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांचे अपडेट देत असतात. श्रावणातील सर्वच सण, उत्सवांच्या शुभेच्छा त्यांनी ट्विटरवरून दिल्या आहेत. युवामित्रांना आंतरराष्ट्रीय युवा दिनापासून ते हॅडलून दिनापर्यंतच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला आहे.
चौकट
सुधीर गाडगीळ दक्ष
सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ हे ट्विटर व फेसबुक दोन्हीवर सक्रिय आहेत. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत त्यांनी सण, उत्सवांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
चौकट
सुरेश खाडे यांची यंत्रणा
मिरजचे आमदार सुरेश खाडे हेही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. त्यांनीही श्रावणातील सण, उत्सवांच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे.
चौकट
विश्वजित कदम प्रभावी
पलस- कडेगावचे आमदार राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम हे फेसबुक व ट्विटर हाताळण्यात आघाडीवर आहेत. श्रावणातील सण, ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिकमधील खेळाडूंचे यश, पक्षाचे कार्यक्रम, उत्सव, बैठकांचे अपडेट्ससाठी सोशल मीडियाचा ते पुरेपूर वापर करतात.
चौकट
जयंतराव सर्वाधिक सक्रिय
इस्लामपूरचे आमदार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील हे सोशल मीडियाचा खुबीने वापर करतात. दिवसभर ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. अगदी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील कार्यक्रमापासून ते मुंबईपर्यंतच्या घडामोडी ते शेअर करतात. सण, उत्सवांच्या शुभेच्छा देण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करतात.
चौकट
सुमनताईंकडून शुभेच्छा
तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील याही सोशल मीडियाचा वापर करतात. त्यांचे स्वतंत्र पेजच आहे. सण, उत्सवांच्या शुभेच्छांसह मतदारसंघातील विविध कार्यक्रम, विकासकामांचे उद्घाटनाचेही अपडेट त्या देत असतात.
चौकट
मानसिंगभाऊंकडून संकष्टीच्या शुभेच्छा
शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंगराव नाईक हेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. अगदी संकष्टी चतुर्थीच्या ते शुभेच्छा देतात. श्रावणातील सण, उत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिल्या आहेत.
चौकट
विक्रम सावंत यांच्याकडून शुभेच्छा
जतचे आमदार विक्रम सावंत हे फेसबुकवर ॲक्टिव्ह आहेत. श्रावणातील सण, उत्सवांच्या शुभेच्छा त्यांनी फेसबुकद्वारे दिल्या आहेत.
चौकट
अनिल बाबर यांचा वापर कमी
खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर हे सोशल मीडियाचा फारसा वापर करीत नसल्याचे दिसून येते. तरीही सणाच्या शुभेच्छा मात्र ते आवर्जून देत असतात.