शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाच्या ५८ वर्षांनंतर लाड यांच्या घरी आमदारकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संघर्षाच्या मार्गाने क्रांतीच्या वाटेवरची कुंडलच्या लढवय्या लाड घराण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे. यश-अपयशाची पर्वा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : संघर्षाच्या मार्गाने क्रांतीच्या वाटेवरची कुंडलच्या लढवय्या लाड घराण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे. यश-अपयशाची पर्वा न करता लढत राहण्याच्या वृत्तीने तब्बल ५८ वर्षांनंतर त्यांच्या घरात पुन्हा आमदारकीने प्रवेश केला.

स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील प्रतिसरकार चळवळीचे सेनापती व तुफान सेनेचे फिल्डमार्शल क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांनी स्वातंत्र्योत्तर काळातही राजकारणातील लढवय्येपणा कायम ठेवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर द्विभाषिक मुंबई प्रांतात असलेल्या तासगाव विधानसभा निवडणुकीत जी. डी. बापूंनी शेतकरी कामगार पक्षातर्फे १९५७ मध्ये प्रथम निवडणूक लढविली. काँग्रेसचे दत्ताजीराव भाऊराव सूर्यवंशी यांचा त्यांनी पराभव करून आमदारकी मिळवली. त्यानंतर पुन्हा त्यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १९६२ मध्ये तासगावमधून निवडणूक लढवली. त्यात काँग्रेसचे धोंडिरामनाना पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

पराभवानंतर शेतकरी कामगार पक्षाने त्यांना १९६२ मध्येच विधानपरिषदेवर संधी दिली. त्यानंतरही सातत्याने ते लढत राहिले. भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी १९७८ आणि १९९० मध्ये निवडणूक लढवली. एकदा काँग्रेसचे उमेदवार संपतराव चव्हाण यांच्याकडून, तर दुसऱ्यावेळी डाॅ. पतंगराव कदम यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. सांगली मतदारसंघातून लोकसभेचीही निवडणूक त्यांनी लढविली होती.

जी. डी. बापू लाड यांनी त्यानंतर सहकार चळवळ, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांचे पुत्र अरुण लाड यांनी २००५ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी अनेकदा उमेदवारीसाठी संघर्ष केला. २०१४ मध्ये त्यांनी पुणे पदवीधरची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती, मात्र त्यात त्यांना अपयश आले. आता २०२० च्या निवडणुकीत त्यांना यश मिळाल्यानंतर तब्बल ५८ वर्षांनंतर त्यांनी घरात आमदारकी खेचून आणली.

जी. डी. बापू लाड यांच्या लढती

वर्ष उमेदवार पडलेली मते टक्के निकाल

१९५७ गणपती दादा लाड (शेकाप) २४७३६ ५६.१३ विजयी

दत्ताजीराव भाऊराव सूर्यवंशी(काँग्रेस) १९३३२ ४३.८६ पराभूत

१९६२ धोंडिराम यशवंत पाटील (काँग्रेस) ३३०८९ ६२ विजयी

गणपती दादा लाड (शेकाप) १८९३२ ३५.४७ पराभूत

१९७८ संपतराव अण्णासाहेब चव्हाण (काँग्रेस) ४३१४९ ५२.१९ विजयी

गणपती दादा लाड (शेकाप) २१०९७ २५.३६ पराभूत

१९९० पतंगराव कदम ६४६६५ ५५.१७ विजयी

गणपती दादा लाड (सीपीआय) ४९७३८ ४२.४४ पराभूत