शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गणपती पंचायतन संस्थानच्या जागांबाबत दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST

सांगली : शहरातील गंजीखान्याची जागा कायदेशीरदृष्ट्या गणपती पंचायतन संस्थानच्या मालकीची आहे. तरीही या जागेसह अन्य काही जागांबाबत महापालिका, पदाधिकारी, ...

सांगली : शहरातील गंजीखान्याची जागा कायदेशीरदृष्ट्या गणपती पंचायतन संस्थानच्या मालकीची आहे. तरीही या जागेसह अन्य काही जागांबाबत महापालिका, पदाधिकारी, नगरसेवक वारंवार दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे संस्थानच्या कोणत्याही जागेबाबत अशी माहिती दिल्यास किंवा त्यावर कोणत्याही योजना आखल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी दिला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेचे संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांनी संगनमताने काळीखण, जुना जनावरांचा बाजार, गंजीखाना अशा विविध जागांबाबत दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे. श्री गणपती पंचायतन संस्थान कायदा १९४० मधील कलम २० व १९ ब प्रमाणे विशेषत: त्याच्या सर्व मिळकतीवर संस्थानच्या उत्तराधिकारी म्हणून माझा हक्‍क स्पष्ट होतो.

परंतु महापालिकेची सत्ता हाती आली म्हणून पंचायतन संस्थानच्या जागेवर

बेकायदेशीर कब्जा घेणे व त्यावर वेगवेगळ्या योजनांचे आमिष दाखवून भूलभुलैया तयार केला जात आहे.

गणपती पंचायतन संस्थानला कोणत्याही भूसंपादन कायद्यातील तरतुदी लागू होत

नाहीत. त्याबाबत न्यायालयात केसेसही सुरू आहेत. गंजीखान्याच्या जागेबाबतही मुंबई उच्च न्यायालयाने दि. ९ जुलै १९९९ चा मनाई हुकूम केला आहे आणि १० ऑक्टोबर १९७४ चा निकालही पंचायतनच्या बाजूने झाला आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गंजीखान्याची जागा

स्वच्छ करीत असल्याबाबत महापालिकेने ताेंडी कळविले होते. त्यानंतर

आम्ही १५ जानेवारी २०२१ रोजी अभियानास सहकार्य राहील, असे लेखी पत्र

महापालिकेस पाठवून त्याची पोहोच घेतली होती. असे असताना या जागेबाबत खोटी

माहिती पसरविण्यात आली. वास्तविक माळबंगल्याची जागा जेव्हा तत्कालीन

आयुक्तांच्या मागणीनुसार सार्वजनिक योजनेस पंचायतन संस्थानने दिली

तेव्हा ती रीतसर कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करून दिली होती. त्यामुळे

कोणत्याही ताेंडी, लेखी पत्राचा आधार घेऊन चुकीची माहिती पसरविण्याचे

उद्योग कुणी करू नयेत.

महापालिकेने स्वत:च कबूल केले आहे की, मंजूर विकास आराखड्यात गंजीखाना जागेवरील म्हणजेच श्री गणपती पंचायतन संस्थानच्या जागेवरचे आरक्षण उठले आहे. यावरून ही मिळकत पंचायतन संस्थानच्या मालकीची आहे त्यामुळे या जागेवर कोणत्याही योजना आखण्यात येऊ नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा पटवर्धन यांनी दिला आहे.