शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत मीरासाहेब दर्गा उरूसाला आजपासून प्रारंभ

By admin | Updated: May 24, 2014 01:02 IST

दुकाने सजली : संगीत सभेत गायक-वादकांचा सहभाग

 मिरज : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणार्‍या मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या उरूसास उद्या, शनिवार दि. २४ पासून प्रारंभ होत आहे. उरूसानिमित्त मानकर्‍यांच्याहस्ते दर्गा आवारात मंडप उभारणी करण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी चर्मकार समाजातर्फे मानाचा पहिला गलेफ अर्पण करण्यात येणार आहे. दि. २५ ते २७ दरम्यान अब्दुलकरीम खाँ स्मृती संगीत सभेत किराना घराण्याचे गायक-वादक सहभागी होणार आहेत. मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याचा यंदा ६३९ वाउरूस आहे. परंपरेप्रमाणे उरूसानिमित्त दर्ग्याच्या पटांगणावर मंडप उभारणी करण्यात आली आहे. गुलबर्गा येथील सुफी संत अफसर बाबा व मुस्तफा बाबा यांच्याहस्ते गंधलेप विधी होणार आहे. आज पहिल्या दिवशी चर्मकार बांधवांचा मानाचा गलेफ अर्पण केल्यानंतर उरूसाला सुरूवात होणार आहे. उरूसाच्या या मुख्य दिवशी पहाटे मानाचा गलेफ अर्पण झाल्यानंतर दि. २५ व २६ रोजी शासनाचा गलेफ, गंधरात्र व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दि. २५ रोजी संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ स्मृती संगीत सभेची सुरूवात होत आहे. दर्गा संगीत सभेत यावर्षी उस्ताद बहाउद्दीन डागर (भोपाळ), ज्योती हेगडे (हुबळी), पंडित आनंद बदामीकर ( सोलापूर), पं. रघुनाथ नाकोड ( हुबळी), जावेद कादरी (हैदराबाद) यांचे सोलो-तबलावादन, संजीव चिमलगी, पं. चंद्रशेखर वझे (मुंबई), कृष्णेंदु वाडेकर (हुबळी), मीना फातर्फेकर, रेवती कामत (पुणे) यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. किराना घराण्यातील देशभरातील दिग्गज गायक, वादक दर्गा संगीत सभेत हजेरी लावणार आहेत. दि. २७ रोजी दर्गा संगीत सभेचा समारोप होणार आहे. दोन आठवडे चालणार्‍या उरूसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उरूसानिमित्त दर्गा इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मार्केट ते स्टेशन चौकापर्यंत रस्त्याच्या दुतफर् ा उरूसानिमित्त दुकाने थाटण्यात आली आहेत. मिरजेच्या ऊरुसात आकर्षण असलेले पाळणेही उभारण्यात आले आहेत. उरूसासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने महापालिका व पोलीस प्रशासनाने तयारी केली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. (वार्ताहर)