शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत माजी नगरसेवक पिता-पुत्रावर हल्ला

By admin | Updated: April 8, 2017 00:10 IST

कॉँग्रेस-राष्ट्रवादी समर्थकांत हाणामारी

मिरज : मिरजेत भारतनगर परिसरात राजकीय वैमनस्यातून माजी नगरसेवक इब्राहीम चौधरी व त्यांचा मुलगा आरिफ चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी सळईने हल्ला करण्यात आला. तसेच त्यांना मारहाणही करण्यात आली. या घटनेमुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे समर्थक जमल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पिटाळले. जखमी आरिफ चौधरी यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इब्राहीम चौधरी यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.भारतनगर येथील कॉँग्रेस नगरसेविकेचे पुत्र समीर मालगावे यांचा वाहनचालक नौशाद शेख व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आरिफ चौधरी यांच्यात चार दिवसांपूर्वी वादावादी व शिवीगाळीची घटना घडली होती. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक इब्राहीम चौधरी, आरिफ चौधरी, नगरसेवक जुबेर चौधरी हे पिता-पुत्र, नौशाद यास याचा जाब विचारण्यासाठी गेले होते. शंभरफुटी रोडवर त्यांचा समोरासमोर वाद झाल्यानंतर नौशाद शेख याचे साथीदार ख्वाजा शेख, समीर शेख यांनी आरिफ चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी सळईने हल्ला केला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर गांधी चौक पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी जमलेल्या दोन्ही गटाच्या समर्थकांच्या जमावाला सौम्य लाठीमार करून पिटाळून लावले. मारहाणीत जखमी आरिफ चौधरी यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी समर्थकांच्या हाणामारीच्या घटनेमुळे भारतनगर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते. मारामारीच्या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी गांधी चौक पोलिस ठाण्यात दोन्ही समर्थकांच्या गटांची गर्दी झाली होती. (वार्ताहर)