शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पाणी योजना ‘एमजीपी’कडे?

By admin | Updated: July 7, 2017 23:24 IST

मिरज पाणी योजना ‘एमजीपी’कडे?

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वादग्रस्त मिरज पाणीपुरवठा योजनेची १०३ कोटीची निविदा महासभेने रद्द केली आहे. त्यात स्थायी समितीने निविदा रद्दला विरोध केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वादात योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनीही तसे संकेत देत, राज्य शासन सर्वोच्च असून, ते असा निर्णय घेऊ शकतात, असे सांगत महासभेला धक्का दिला आहे. अमृत योजनेतून मिरज पाणीपुरवठा योजनेसाठी १०३ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ८७ कोटीची निविदाही प्रशासनाने प्रसिद्ध केली होती. या निविदेवरून महासभा विरूद्ध स्थायी समिती असा वाद निर्माण झाला आहे. निविदा दर मान्यतेसाठी स्थायी समितीकडे असतानाच महासभेने निविदा रद्द करण्याचा ठराव केला आहे. महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांच्या वादात या योजनेचे काम रखडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर योजनेचे काम महापालिकेकडून काढून घेऊन ते एमजीपीकडे देण्यात येणार असल्याचीही जोरदार चर्चाही सुरू होती. त्याबाबत आयुक्त खेबूडकर यांना विचारता ते म्हणाले की, राज्य शासन हे सर्वोच्च आहे. ते कोणताही निर्णय घेऊ शकते. जीवन प्राधिकरणकडे योजना वर्ग करतील अथवा अन्य त्रयस्थ विभागाकडून काम करून घेतील. शासन जो निर्णय देईल, त्याची प्रशासन अंमलबजावणी करेल. महासभेचा निविदा रद्दचा ठरावही आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देऊ. स्थायी समितीचा ठराव शासनाकडे पाठविला आहे. पण त्यावर अद्याप उत्तर आलेले नाही. या योजनेत लोकहित महत्त्वाचे आहे. कोल्हापूर महापालिकेने सहावेळा निविदा काढूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. खेबूडकर इथे आहेत, म्हणून योजना मंजूर झालेली नाही. महापालिकेवरील बोजा कसा कमी होईल हे आम्ही पाहणार. इचलकरंजीची निविदा कमी दराने आली, त्याचाही अभ्यास करू, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. २५ हजार वृक्ष लागवडसांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रात २५ हजार वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून अजूनही ४ हजार झाले लावली जाणार आहेत. ही झाडे जगविण्यासाठी विविध उपाययोजनाही आखण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील झाडांना एक हजार ट्री गार्ड देणार आहोत. तसेच झाडांना पाणी घालण्यासाठी नवीन टँकरही खरेदी करणार असल्याचे खेबूडकर यांनी सांगितले.