शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मिरजकरांनीच जपला माणुसकीचा खरा धर्म

By admin | Updated: July 4, 2016 00:16 IST

राजेंद्रसिंह राणा : लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केल्याबद्दल प्रशंसा, जलदूत एक्स्प्रेसची, विहिरीची पाहणी

मिरज : जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी रविवारी मिरज रेल्वे यार्डास भेट देऊन लातूरला पाठविण्यात येणाऱ्या जलदूत एक्स्प्रेसची माहिती घेतली. पाण्यासाठी सर्वत्र कलह सुरू असताना, मिरजेतील लोक दुष्काळग्रस्त लातूरला पाणी देत असल्याबद्दल राणा यांनी प्रशंसा केली. खऱ्या अर्थाने मिरजकरांनी भारतीय संस्कृतीचे व माणुसकीच्या धर्माचे पालन केल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. राणा यांनी रेल्वे यार्डातून दररोज पाणी घेऊन लातूरला जाणाऱ्या जलदूत एक्स्प्रेसची व हैदरखान विहिरीची पाहणी केली. ते म्हणाले, मिरजेतून रेल्वेने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे लातूरच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मिरजेत रेल्वे स्थानकात टँकरमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था कायमस्वरूपी ठेवल्याने भविष्यातही त्याचा उपयोग होईल. लातूरला पाणी देणाऱ्या मिरजेचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. माणुसकीच्या धर्माचे आणि भारतीय संस्कृती अत्यंत चांगल्या पद्धतीने जोपासण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी रेल्वे स्थानकास भेट देऊन पाणी भरण्याच्या नियोजनाच्या व्यवस्थेची पाहणी केली. टँकरमध्ये पाणी भरण्याची, शुध्दीकरणाची व्यवस्था, हैदरखान विहिरीत करण्यात येणारा पाणीसाठा, लातूरला दोन महिन्यात किती कोटी लिटर पाणी पाठविण्यात आले, याची माहिती घेतली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, ठेकेदार शशांक जाधव यांनी त्यांना माहिती दिली. सर्वत्र पाण्यासाठी ओरड सुरू असल्याने नद्यांचे पुनरूज्जीवन आवश्यक आहे, असे मत राणा यांनी व्यक्त केले. मिरज डेव्हलपमेंट फोरमतर्फे लोकसहभागातून केलेल्या मिरज ओढा सफाईची राणा यांनी पाहणी करून वृक्षारोपण केले. यावेळी मकरंद देशपांडे, गजेंद्र कुळ्ळोळी, पांडुरंग कोरे, पृथ्वीराज पवार, सुकुमार पाटील, राजा देसाई, मनीर मुल्ला, नंदू पवार, जलबिरादाराचे सुनील जोशी, नरेंद्र चूघ, डॉ. रवींद्र व्होरा उपस्थित होते. (वार्ताहर) प्रशासनाचा अडथळा येऊ नये... मिरजेत लोकसहभागातून सुमारे अडीच किलोमीटर ओढापात्राची सफाई करण्यात आली असताना, तहसीलदारांनी मुरूम खुदाईचा ठपका ठेवून चार कोटी रूपये दंडाची नोटीस दिली आहे. प्रशासनाच्या नोटिसीमुळे ओढापात्र सफाई व पाणीसाठ्यासाठी तलावाची खुदाई बंद करण्यात आल्याची माहिती किशोर पटवर्धन यांनी दिली. त्यावर, लोकसहभागातून चांगले काम चालू असताना यात शासकीय यंत्रणेने अडथळा आणू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत मध्यस्थी करून काम सुरू करावे, अशी सूचना राणा यांनी केली.