शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत जबरी चोऱ्या करणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिरज शहरात वाटसरुंना अडवून लुटणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मिरज शहरात वाटसरुंना अडवून लुटणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सुरज विलास साठे (वय २२, रा. शास्त्री चौक, मिरज) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी मिरज परिसरातील गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक मिरजेत गस्तीवर असताना, शहरातील शास्त्री चौकात एकजण संशयास्पद स्थितीत उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेत चौकशी केली. त्यात त्याने एक महिन्यापूर्वी कृष्णा घाट रोडवर एका वाटसरुला अडवून त्याच्याकडून मोबाईल काढून घेतल्याची माहिती दिली. तसेच पाच दिवसांपूर्वी मिरज बसस्थानकाजवळ रात्रीच्यावेळी एका रिक्षाचालकाला अडवून त्याच्या खिशातील पैसे काढून घेत असताना त्याने अडविल्याने त्याच्या गळ्यावर व हातावर वार करुन त्याच्या खिशातील सहाशे रुपये काढून घेतल्याचे सांगितले. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात या दोन्ही गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती मिळाली.

पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, संजय कांबळे, सुधीर गोरे, शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.