शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

लोकसंख्येत मिरज तालुका अव्वल...

By admin | Updated: July 10, 2014 23:18 IST

आटपाडीत सर्वात कमी : स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण बिघडले

अविनाश कोळी ल्ल सांगलीलोकसंख्येच्याबाबतीत महाराष्ट्रात सांगली जिल्हा पंधराव्या क्रमांकावर असून जिल्ह्यात सध्या सर्वाधिक म्हणजे ३0 टक्के लोकसंख्या मिरज तालुक्यात आहे. सर्वात कमी ५ टक्के इतकी लोकसंख्या आटपाडी तालुक्यात आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार केला, तर नागरीकरणाचा वेग मंदावला असून स्त्री-पुरुष गुणोत्तराचे प्रमाणही बिघडल्याचे दिसून येते.सध्या जिल्हा सांख्यिकी विभागाकडे असलेल्या आकडेवारीनुसार सांगली जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाख २२ हजार १४३ इतकी आहे. पन्नास वर्षांपूर्वी २३.५ टक्के असणारा लोकसंख्या वाढीचा दर २०११ मध्ये ९.१८ टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्राची वाढीची सरासरी १५.९९ इतकी आहे. तुलनेने ही टक्केवारी समाधानकारक आहे. नागरीकरणाचा वेग गेल्या दहा वर्षात मंदावला आहे. १९९१ ते २00१ या दहा वर्षात नागरीकरणाचा वेग २६ टक्के होता. २00१ ते २0११ या कालावधित तो १३ टक्क्यांवर आला. म्हणजे निम्मे प्रमाण आहे. नागरी लोकसंख्येचे जिल्ह्यातील प्रमाण २६.५६ इतके आहे. जिल्ह्यात नागरी लोकसंख्या ७ लाख १९ हजार इतकी आहे. नागरी लोकसंख्येच्या ७२ टक्के लोकसंख्या ही सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात राहते. १९६१ ते २००१ या चाळीस वर्षांच्या कालावधित जिल्ह्यातील शहरीकरण ८.९१ टक्क्यांनी वाढले आहे. तितक्याच प्रमाणात ग्रामिणीकरण घटल्याचे दिसून येते. महिलांच्या साक्षरतेचे प्रमाणही समाधानकारक नाही. जिल्ह्यात २०११ पर्यंत साक्षरतेत अजूनही महिला पुरुषांच्या कितीतरी मागे असल्याचे दिसून येते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या साक्षरतेची टक्केवारी १५.७४ टक्क्यांनी कमी आहे.