तालुक्यातील मालगाव, मल्लेवाडी, विजयनगर, म्हैसाळ, शिपूर, कर्नाळ, भोसे, कळंबी, एरंडोली, आरग, लिंगनूर, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, तानंग, ढवळी, कवलापूर, डोंगरवाडी, अंकली, इनामधामणी, चाबुकस्वारवाडी, कवठेपिरान व तुंग या २२ ग्रामपंचायतींतात दुरंगी व तिरंगी लढती होणार आहेत.
अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी ३८८ जणांनी ४१० अर्ज माघारी घेतल्याने २२ ग्रामपंचायतींच्या २४१ जागांसाठी ५६४ जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. २२ पैकी ९ ग्रामपंचायतींपैकी इनामधामणीमध्ये १०, कवलापूर येथे ३, ढवळी येथे ५, भोसे येथे ७, विजयनगर येथे १ व अंकलीतील ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. डोंगरवाडी येथे २ व इनामधामणीतील १ जागा रिक्त राहिली.
मालगाव ग्रामपंचायतीत ५९, मल्लेवाडी २५, विजयनगर २०, म्हैसाळ ३४, शिपूर १६, कर्नाळ २८, भोसे १७, कळंबी ३१, एरंडोली ३९, आरग ५१, लिंगनूर २८, शिंदेवाडी १९, लक्ष्मीवाडी ११, तानंग २४, ढवळी १०, कवलापूर २८, डोंगरवाडी १०, अंकली १९, इनामधामणी ५, चाबुकस्वारवाडी १८, कवठेपिरान येथे ३४ आणि तुंगमध्ये ३० उमेदवार मैदानात आहेत.