सांगली : बिनकामी व दिलेल्या जागी अस्तित्वात नसलेल्या सहकारी संस्था अवसायनात काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, मिरज तालुक्यातील २०८ संस्थांच्या अवसायनाचे आदेश सहकार विभागाने काढले आहेत. अवसायनात गेलेल्या सहकारी संस्थांची संख्या आता ४७१ इतकी झाली आहे. आणखी सुमारे दीडशे संस्था अवसायनात निघण्याची चिन्हे आहेत. जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एकूण ७५९ संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. पूर्व अंतरिम, अंतरिम आणि अंतिम नोटिसा बजावून त्यांना म्हणणे मांडण्यासाठी पुरेशी संधीही दिली होती. अंतिम मुदत गुरुवारी संपुष्टात आल्यानंतर एकूण २६३ संस्था अवसायनात काढण्यात आल्या होत्या. मिरज तालुक्यातील आणखी २०८ सहकारी संस्थांच्या अवसायनाचे आदेश काढले आहेत. त्यामुळे ही संख्या पावणेपाचशेच्या घरात आहे. सांगली जिल्ह्यातील बिनकामी सहकारी संस्थांचे पॅकअप् आता सुरू झाले आहे. सहकार विभागाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणात सांगली जिल्ह्यात ७५९ संस्था बिनकामी आढळल्या आहेत. नोटिसा बजावल्यानंतर यातील सुमारे ८० संस्थांनी आपले म्हणणे सादर केले आहे. शासकीय अनुदानाअभावी संस्था रखडल्याचे यातील बहुतांश संस्थाचालकांनी सांगितले आहे. त्यामुळे सुनावणी सुरू असलेल्या या संस्था वगळता अन्य संस्थांच्या अवसायनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ११६ संस्थांच्या अवसायनाचे आदेश देण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात आणखी १४४ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या. यात आणखी दोनशे संस्थांची भर पडली. या मोहिमेत ज्या सहकारी संस्था नोंदणीकृत पत्त्यावर आढळून येणार नाहीत किंवा ज्यांचा कोणताही ठावठिकाणा नाही, त्यांच्यासंदर्भात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून त्या संस्था बंद असल्याबाबतची खातरजमा करण्यात आली. पूर्णपणे बंद असलेल्या व कार्यस्थगित संस्था अवसायनात घेण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा उपनिबंधकांनी यापूर्वीच दिल्या आहेत. ४०८९ संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी केवळ ३ हजार ३३० संस्थाच चालू स्थितीत आढळून आल्या. कागदोपत्री जिवंत असलेल्या संस्थांची संख्या ३१० आणि ठावठिकाणा नसलेल्या संस्थांची संख्या ४४९ इतकी आहे. सर्वेक्षणात बिनकामी आढळलेल्या सर्वाधिक संस्था मिरज तालुक्यात आढळून आल्या. मिरज तालुक्यातील १२१४ सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ८११ संस्था चालू स्थितीत आढळल्या. ८४ बंद अवस्थेत, २३६ बिनकामी, तर जागेवर न सापडलेल्या ८३ संस्था होत्या. (प्रतिनिधी)बिनकामी संस्था : आता पॅकअप सांगली जिल्ह्यातील बिनकामी सहकारी संस्थांचे पॅकअप् आता सुरू झाले आहे. सहकार विभागाच्या आदेशानुसार झालेल्या सर्वेक्षणात सांगली जिल्ह्यात ७५९ संस्था बिनकामी आढळल्या आहेत. नोटिसा बजावल्यानंतर यातील सुमारे ८० संस्थांनी आपले म्हणणे सादर केले आहे. शासकीय अनुदानाअभावी संस्था रखडल्याचे यातील बहुतांश संस्थाचालकांनी सांगितले आहे.जिल्ह्यातील ४४९ संस्थांचापत्ताच नाहीकागदोपत्री जिवंत असलेल्या संस्थांची संख्या ३१० आणि ठावठिकाणा नसलेल्या संस्थांची संख्या ४४९ इतकी आहे. सर्वेक्षणात बिनकामी आढळलेल्या सर्वाधिक संस्था मिरज तालुक्यात आढळून आल्या, अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिरज तालुक्यातील २०८ संस्था अवसायनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 00:13 IST