शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मिरज आणखी दोन रेमडेसिविर इंजेक्शन गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST

रेमडेसिविरच्या दोन इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी पोलिसांनी मिरज सिव्हिलमधील अधिपरिचारक सुमित हुपरीकर व खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ ...

रेमडेसिविरच्या दोन इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी पोलिसांनी मिरज सिव्हिलमधील अधिपरिचारक सुमित हुपरीकर व खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ दाविद वाघमारे यांना चार दिवसांपूर्वी अटक केली आहे. या गंभीर प्रकाराबाबत सिव्हिल प्रशासनाच्या समितीमार्फत चाैकशी सुरू आहे. चाैकशीदरम्यान रेमडेसिविर साठ्यातील आणखी दोन इंजेक्शन कमी असल्याचे आढळ‍ल्याने खळबळ उडाली आहे. रेमडेसिविर काळाबाजारात आणखी काही जणांच्या सहभागाची शक्यता असून सिव्हिल प्रशासनाने वेगवेगळ्या वाॅर्डातून गायब झालेल्या इंजेक्शनचा शोधासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची चाैकशी केली. मात्र इंजेक्शनचा हिशेब लागत नसल्याने याबाबत पोलिसांत तक्रार देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पोलिसांकडून या प्रकाराचा सखोल तपास झाल्यास यात सहभाग असलेले रॅकेट व आणखी रेमडेसिविर इंजेक्शन चोरीचा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. सिव्हिलमधील इंजेक्शन विक्रीत सिव्हिलबाहेरील आणखी काही जणांचा सहभाग असल्याचीही चर्चा आहे. गेल्या वर्षभर कोरोना रुग्णांच्या उपचारात महत्त्वाची भूमिका असलेले मिरज सिव्हिल रुग्णालय रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे चर्चेत आले आहे.