रात्री द्राक्षबागेतील घडांची नासधूस करीत आहेत. ग्रामपंचायतने याबाबत तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही याची दखल घेतलेली नाही. वनविभागानेही याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. मोकाट गायींमुळे दोन आठवड्यांत अनिल कोरे, अनिल माळी यांच्या द्राक्षांचे दोन लाख, प्रवीण शेजूळ यांच्या ढबू मिरचीचे एक लाख, मक्याचे पन्नास हजार, विकास गोदे यांच्या मका व शाळूचे एक लाख, धीरज कुसनाळे यांचे द्राक्षाचे पन्नास हजार, सोनू सोलनकर यांचे एक एकर मका व गवारीचे दीड लाख, संदीप पांढरे यांच्या एक एकर क्षेत्रातील मक्याचे पन्नास हजार, इसाक नदाफ यांचे दोन एकर टोमॅटोचे दोन लाख, केदारी खरात यांच्या मक्याचे एक लाख, चन्नाप्पा कांबळे यांच्या मक्याचे - पन्नास हजार, बाळू कांबळे यांच्या पाच एकरातील मका ऊस पिकाचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
हे नुकसान असह्य झाल्याने मोकाट गायींचा बंदोबस्त करा अन्यथा नुकसानग्रस्त शेतकरी रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा सलगरे उपसरपंच सुरेश कोळेकर यांनी दिला आहे.
चाैकट
मध्यरात्री पिकांवर हल्ला
या परिसरात शेतातील पिकांवर गायी रात्री एक ते पहाटे चारदरम्यान हल्ला करतात. पिके आडवी पाडून, नासधूस करतात. शेतकऱ्यांची चाहूल लागल्यास एकट्या दुकट्याच्या अंगावर येतात.