शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक बंदमुळे मिरज आगाराला २० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST

सदानंद औंधे मिरज : लाॅकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने मिरजेतून दररोज ३८ हजार किमी एसटीच्या ...

सदानंद औंधे

मिरज : लाॅकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक बंद असल्याने मिरजेतून दररोज ३८ हजार किमी एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. वार्षिक साडेबारा कोटी रुपये तोट्यात असलेल्या मिरज आगाराला लाॅकडाऊनमुळे गतवर्षी २० कोटी तोटा झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ मे पासून राज्य परिवहन मंडळाची जिल्ह्यातील सर्व आगारांतून एसटी सेवा बंद आहे. मिरज आगारातून जिल्हांतर्गत, परराज्य व परजिल्ह्यात दररोज एकूण ४५० फेऱ्या व शहरी व ग्रामीण भागात दररोज ३८ हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक होते. आता २६ दिवसांच्या बंदनंतर ‍१ जूनपासून मिरज आगारातून केवळ इचलकरंजी व कोल्हापूरसाठी दोन फेऱ्या सुरू झाल्या आहेत. उद्यापासून मिरज ते पुणे एसटी सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.

बसवाहतूक बंद झाल्याने सुमारे ४८० कर्मचारी व १०३ बसेस असलेल्या मिरज आगारात सद्या कार्यशाळेत गाड्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. मिरज आगाराचे दररोज १२ लाख उत्पन्न असून, एप्रिल, मे महिन्यांत सुटीच्या हंगामात दररोज १५ लाख रुपये उत्पन्न मिळते. मात्र गतवर्षी व यावर्षी लाॅकडाऊनमुळे ऐन हंगामातच एसटीची चाके थांबल्याने आगाराचे कामकाज ठप्प आहे. मिरज स्थानकात दररोज सुमारे पाचशे बसेस ये-जा करतात. कर्नाटकातील अथणी, चिकोडी, जमखंडी, विजापूर, बागलकोट या शहरांतून कर्नाटक एसटी मोठ्या संख्येने मिरजेत येत असल्याने मिरज बसस्थानकात दररोज बसेसची मोठी गर्दी असते. मात्र, एसटी वाहतूक बंद असल्याने मिरज बस स्थानकात शुकशुकाट आहे. मिरज एसटी आगार वार्षिक सुमारे साडेबारा कोटी रुपये तोट्यात होते. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे तोट्यात आणखी वाढ होऊन १९ कोटी ९२ लाखांचा तोटा झाला आहे. बसवाहतूक बंद असल्याने स्थानकातील विविध व्यवसाय करणारे विक्रेते, हमालांचाही रोजगार बुडाला आहे.

चाैकट

लाॅकडाऊन निर्बंधांत सवलत मिळाल्यानंतर २६ दिवसांनंतर मिरज आगारातून पुन्हा एसटी वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने काही ठराविक मार्गावरच फेऱ्या सुरू झाल्या आहेत. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार एसटी फेऱ्या सुरू होणार आहेत.