शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मिरज सिव्हिलची लिफ्ट झाली बंद

By admin | Updated: August 31, 2014 23:57 IST

रुग्णांचे हाल : स्ट्रेचर, व्हीलचेअर नादुरूस्त

मिरज : मिरजेतील शासकीय रुग्णालयाची लिफ्ट कायम बंद असल्याने रुग्णांचे हाल सुरू आहेत. शासकीय रुग्णालयात मिरजेसह परिसरातील तालुक्यातून व कर्नाटकातून रुग्ण येतात. रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांना एक्सरे, सोनोग्राफी, डायलेसीस अशाप्रकारच्या तपासण्या करण्यासाठी लिफ्ट बंद असल्याने नेणे-आणणे अवघड ठरत आहे. शासकीय रुग्णालय तीन मजले असलेल्या शासकीय रुग्णालयात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येते. वृध्द व अत्यवस्थ रुग्णांना खाली वर नेण्या-आणण्यासाठी लिफ्टची आवश्यकता आहे. लिफ्ट बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. बंद लिफ्टमध्ये भंगाराचे साहित्य ठेवण्यात आले आहे. उंच रॅम्पवरून स्ट्रेचरवरून ढकलत न्यावे लागते. मात्र रुग्णांना व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरवरून न्यावे लागते. मात्र, स्ट्रेचर खराब आहेत. जुन्या स्ट्रेचरची चाके फिरत नाहीत. रुग्ण घेऊन जात असताना चाकांचा आवाज येतो. आंतररुग्ण विभागातून रुग्णाला बाह्यरुग्ण विभागापर्यंत जाण्या-येण्याचा रस्ताही खराब आहे. रस्त्यावर पावसाचे साचलेले पाणी असते. अशा परिस्थितीत रुग्णांना ने-आण करण्यासाठी नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. रुग्णांना ने-आण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून वेगळा मार्ग बांधण्यात आला आहे. नवीन मार्गाचा वापर अद्याप बंद असून, त्याचा वापर रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणासाठी व पाळीव कुत्री फिरण्यासाठी होत आहे. अपुरा कर्मचारी, तोडक्या, मोडक्या व्हीलचेअर्स, स्ट्रेचर्सची बंद चाके, बंद लिफ्ट यामुळे सर्व रुग्णांना व नातेवाईकांना सहन करावा लागतो. सिव्हिल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रुग्णांना आवश्यक सुविधा देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)