मिरज : मिरजेतील वाळवेकर गल्ली परिसरातून उदय रावळ यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. याबाबत रावळ यांनी मिरज शहर पोलिसांत तक्रार केली आहे.
-------------
मिरजेत दुचाकी लंपास
मिरज : मिरजेतील महात्मा फुले चौकातून कुमार श्रीकांत कद्दू यांची दहा हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने लंपास केली. याबाबत कद्दू यांनी गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली आहे.
---------------
सिव्हीलमधून मोबाईल चोरी
मिरज : मिरजेतील शासकीय रुग्णालयातून स्नेहा दत्तात्रय बोबडे यांचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञाताने चोरून नेला. याबाबत बोबडे यांनी गांधी चौक पोलिसांत तक्रार दिली आहे.
------------
ट्रक व मोटार अपघातात तिघे जखमी
मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर मालट्रक व मोटारीच्या अपघातात तिघेजण किरकोळ जखमी झाले. याबाबत मोटारचालक धनाजी दत्तात्रय जाधव यांनी ट्रक चालकाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
जाधव हे तुळजापूर येथून मिरजकडे येत असताना भोसे येथे एस.टी.ला ओव्हरटेक करत असताना ट्रकने (क्र. एमएच १० एफसी ६२११) त्याच्या मोटारीला ठोकरले. अपघातात जाधव यांच्यासह अन्य दोघेजण किरकोळ जखमी होऊन मोटारीचे नुकसान झाले. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------
महिलेस दमदाटीची तक्रार
मिरज : मिरजेत शास्त्री चाैक परिसरात ड्रेनेजच्या सांडपाण्याबाबत तक्रार केल्याने महिलेस शिवीगाळ करून येथे राहायचे नाही, अशी धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीमती लक्ष्मी कुमार आवळे यांनी अमीन जातगार, मक्तुम जातगार आणि बादशहा जातगार या तिघांविरुद्ध मिरज शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.