शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत रेल्वेस्थानकात चाकूने भोसकून खून

By admin | Updated: February 28, 2017 00:51 IST

संशयितास अटक : भांडणातून दारूच्या नशेत वार

मिरज : मिरज रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर महादेव चव्हाण (वय ६०, रा. बेळगाव) या हॉटेलात आचारीकाम करणाऱ्या वृद्धाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. दारूच्या नशेत असलेला मारेकरी सत्यनारायणदास रामदाससिंग भदौरिया (५६, रा. खलीलपूर, जि. भिंड, मध्य प्रदेश) याला घटनास्थळीच रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर सर्वांसमक्ष घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती.मृत महादेव चव्हाण बेळगाव येथील रहिवासी असून, तो काही वर्षांपासून मिरज-पंढरपूर रस्त्यावरील एका हॉटेलात आचारी म्हणून काम करीत होता. त्याचा साथीदार सत्यनारायणदास भदौरिया साधूच्या वेशात भीक मागत होता. दोघेही रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर आश्रयाला असल्याने दोघांची मैत्री होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता महादेव व सत्यनारायणदास रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर मद्य प्राशन करीत बसले होते. महादेव हा सत्यनारायणदास यास दारूच्या नशेत काही तरी बोलला. त्यामुळे दोघांत बाचाबाची सुरू झाली. दारूच्या नशेत असलेल्या सत्यनारायणदास याने जवळील चाकूने महादेव याच्या पोटावर व छातीवर चार वार केले. या चाकू हल्ल्यात महादेव चव्हाण याच्या पोटातील आतडी बाहेर पडून, त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याआधी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महादेवचा आरडाओरडा ऐकून, तेथे बंदोबस्तास असलेले पोलिस कर्मचारी प्रकाश कुंभार व प्रमोद सुरवसे यांनी सत्यनारायणदास भदौरिया यास पकडले. रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे मोठी गर्दी जमली होती. पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांच्यासह रेल्वे पोलिसांनी मृतदेह व रक्ताने माखलेला चाकू ताब्यात घेतला. खूनप्रकरणी पोलिस कर्मचारी प्रकाश कुंभार यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, सत्यनारायणदास भदौरिया याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.