शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील इंधन डेपो असुरक्षित !

By admin | Updated: August 31, 2014 23:36 IST

सुरक्षेच्या उपाययोजना असूनही चोऱ्या

सदानंद औंधे - मिरज --पाच जिल्ह्यांना इंधन पुरवठा करणाऱ्या मिरजेतील इंधन डेपो चोरट्यांच्या उपद्रवामुळे व सभोवताली असलेल्या नागरी वस्तीमुळे असुरक्षित बनले आहेत. इंधन चोरट्यांचा उपद्रव थांबत नसल्याने त्रस्त झालेल्या इंधन कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.इंडियन आॅईल व भारत पेट्रोलियम कंपनीचे मिरजेत रेल्वेस्थानकालगत इंधन डेपो आहेत. रेल्वे टँकरमधून येणाऱ्या पेट्रोल, डिझेल व रॉकेल या इंधनाचा मिरजेच्या डेपोत साठा करुन सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना पुरवठा करण्यात येतो. इंधन डेपोतील मोठ्या टाक्यात कोट्यवधी लिटर पेट्रोल व डिझेलचा साठा करण्यात येतो. सुरक्षेच्यादृष्टीने इंधन डेपो शहरापासून दूर असले पाहिजेत. मात्र मिरजेतील इंधन डेपोभोवती गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात इमारती व वसाहती वाढल्या आहेत. रहिवासी इमारतीसह रुग्णालये, लॉज व बिअरबार डेपोच्या कुंपणालगत उभारण्यात आल्याने इंधन डेपोच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. डेपोलगत नागरी वसाहत वाढत असल्याने मिरजेतील दोन्ही कंपन्यांचे डेपो भिलवडीजवळ हजारवाडी येथे हलविण्याचा प्रस्ताव आहे. मात्र जागा उपलब्ध झाली नसल्याने डेपो स्थलांतर रखडल्याची माहिती मिळाली. इंधन डेपोच्या सुरक्षेसाठी डेपोजवळून जाणारा रस्ता खासगी वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय काही वर्षापूर्वी घेण्यात आला होता. मात्र त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. दररोज रेल्वे टँकरमधील लाखो लिटर पेट्रोल व डिझेल डेपोतील टाक्यात उतरविताना इंधन चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. गेल्या काही वर्षात इंधन चोरी रोखण्यासाठी पेट्रोल टँकरला सील व इतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रेल्वे टँकरमधून इंधन काढून डेपोतील टाकीत भरण्याचे काम खासगी ठेकेदारांकडे आहे. इंधन डेपो व्यवस्थापकांनी दैनंदिन चोरीच्या उपद्रवाबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याने काही दिवसांपूर्वी रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी मिरजेत पाहणीला आले. पाहणीदरम्यान चोरटे गायब झाले. चार दिवस इंधन चोरी बंद होती. मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या... असा प्रकार सुरु झाला आहे. सुरक्षेच्या उपाययोजना असूनही चोऱ्यारेल्वे सुरक्षा दल व पोलीस यंत्रणा असतानाही इंधन चोऱ्यांमुळे इंधन डेपोतील अधिकारी त्रस्त आहेत. चोऱ्यांमुळे इंधन कंपन्यांचे लाखो रुपये नुकसान होत असताना, डेपोलगत अवैध इंधन साठ्यांमुळे इंधन डेपो परिसर धोकादायक बनला आहे.खासगी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन, रखवालदार असतानाही दररोज हजारो लिटर पेट्रोल व डिझेलची चोरी सुरु आहे. मोठ्या कॅनमधून भर दिवसा रिक्षा व व्हॅनमधून चोरट्या इंधनाची वाहतूक सुरु आहे. रेल्वेस्थानकालगतची झोपडपट्टी, झारीबाग झोपडपट्टीत अशा चोरट्या इंधनाचे साठे करण्यात येतात. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांना धोका निर्माण झाला आहे. चोरलेले पेट्रोल व डिझेल ६० व ५० रुपये प्रति लिटर दराने विक्री करण्यात येते.गस्तीशिवाय काही नाही...इंधन चोर टोळ्या तपासासाठी परगावी जाणाऱ्या काही पोलिसांच्या खासगी वाहनांना इंधन पुरवठा करीत असल्याची चर्चा आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना मोफत इंधनाची व्यवस्था आहे. अस्लम खॉजा, जोसेफ, विजय अशा वेगवेगळ्या इंधन चोरांच्या टोळ्या कार्यरत आहेत. मात्र त्यांच्यावर अपवादानेच कारवाई झाली आहे. इंधन डेपो परिसर पोलिसांच्या दफ्तरी ‘संवेदनशील’ अशी नोंद आहे. मात्र गस्तीशिवाय फारसे काही घडत नाही.