शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत आरोपीचे पोलीस ठाण्यातून पलायन

By admin | Updated: January 25, 2016 00:58 IST

कुंपण भिंतीवरून उडी : पोलिसांसह नागरिकांनी पाठलाग करून पुन्हा केले जेरबंद

मिरज : मिरजेत मोबाईल दुकान फोडल्याच्या प्रकरणातील संशयित बापू दिलीप काळे याने पोलीस ठाण्याच्या कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले. पोलीस व नागरिकांनी पाठलाग करून काळे यास पुन्हा जेरबंद केले. आरोपीस न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी दिली. मिरजेतील हायस्कूल रस्त्यावरील स्कायलाईन मोबाईल शॉपी फोडून साडेतीन लाखांचे मोबाईल चोरून नेणाऱ्या सांगलीतील बापू दिलीप काळे, अजय कांबळे (रा. जुना बुधगाव रस्ता सांगली) यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघांपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. अजय कांबळे व बापू काळे यांना रविवारी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार होते. न्यायालयात नेण्यापूर्वी बापू काळे याने, उलटी येत असल्याचा बहाणा केला. उलटी करण्यासाठी त्याला पोलीस ठाण्याच्या आवारातील स्वच्छतागृहाकडे नेण्यात आले. उलटी करण्याचे नाटक करीत काळे याने अचानक कुंपणभिंतीवरून उडी मारून पलायन केले. काळे याच्या पलायनामुळे पोलिसांची धावपळ उडाली. बापू काळे पोलीस ठाण्यामागील मंगल टॉकीजनजीकच्या बोळातून गुरूवार पेठेतील आठवडा बाजारात शिरला. पोलीस व नागरिकांनी त्याचा पाठलाग करीत आरडा-ओरडा केल्याने मुबारक बागवान या भाजी विक्रेत्याने बापू काळे यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीच्या पलायनामुळे चांगलीच दमछाक झालेल्या पोलिसांना आरोपी पुन्हा सापडल्याने हायसे वाटले. आरोपी अजय कांबळे व बापू काळे यांना न्यायालयाने दि. २८ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.