शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत शहनाई, सतार, तबलावादनाने रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:07 IST

मिरज : मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरूसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत शास्त्रीय गायन, शहनाईवादन, सतारवादन, तबलावादनाने मैफल ...

मिरज : मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरूसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत शास्त्रीय गायन, शहनाईवादन, सतारवादन, तबलावादनाने मैफल रंगली. किराना घराण्यातील दिग्गज गायक, वादकांना श्रोत्यांची दाद मिळाली.अब्दुल करीम खाँ संगीत सभेच्या पहिल्यादिवशी दुसऱ्या सत्राचा प्रारंभ सदाशिव मुळे यांच्या शहनाई वादनाने झाला. मुळे यांनी राग हंस ध्वनी आळविला. त्यांना संदेश खेडेकर यांनी समर्पक तबलासाथ केली. श्रीमती श्रुती देशपांडे (पुणे) यांनी राग चंद्र कंस आळविला. विलंबित एकतालात व द्रुत त्रितालात त्यांनी चीजा सादर केल्या. त्यांना पंडित अनंत केमकर यांनी हार्मोनियमसाथ व पंडित माधव मोडक यांनी तबलासाथ केली. उस्ताद रफिक खान (धारवाड) यांनी सतारवादन केले. त्यांनी सतारीवर राग रागेश्री आळविला. त्यांना शैलेश शेनॉय यांनी तबलासाथ केली. पंडित व्यंकटेशकुमार (धारवाड) यांनी राग बिहाग गायिला. तीनताल मध्यलयीत त्यांनी बंदिश सादर केली. त्यांना महेश देसाई यांनी तबलासाथ व पंडित सुधांशू कुलकर्णी यांनी हार्मोनियमसाथ केली. पंडित रवी चारी (मुंबई) यांनी सतारवादन केले. त्यांनी सतारीवर राग बागेश्री सादर केला. त्यांना हरमितसिंग यांनी तबलासाथ केली. श्रीमती मंजिरी असनारे-केळकर (नाशिक) यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग भिन्न षडज् आळविला. त्यांना सारंग सांभारे यांनी हार्मोनियमसाथ व श्रीकांत भावे यांनी तबलासाथ केली.अजिंक्य जोशी (पुणे) यांचे सोलो तबलावादन झाले. त्यांनी त्रितालात तबलावादन केले. कायदा, तुकडा, रेला या तबल्याच्या विविध स्वरछटा त्यांनी सादर केल्या. त्यांना सागर कुलकर्णी यांनी लेहरासाथ केली. श्रीमती गायत्री जोशी (पुणे) यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग जोगकंस सादर केला. त्यांना सागर कुलकर्णी यांनी हार्मोनियमसाथ व अजिंक्या जोशी यांनी तबलासाथ केली. पंडित कल्याण अपार (पुणे) यांचे शहनाईवादन झाले. त्यांनी शहनाईवर राग ललत आळविला. त्यांना हार्मोनियमसाथ संदीप तावरे यांनी व मनमोहन कुंभारे यांनी तबलासाथ केली. श्रीमती सुचेता आठलेकर (मुंबई) यांचे शास्त्रीय गायन झाले. आठलेकर यांनी राग मियाकी तोडी सादर केला. त्यांना संदीप तावरे यांनी हार्मोनियम व प्रदीप कुलकर्णी यांनी तबलासाथ केली.गायन-वादनाचा हा कार्यक्रम पहाटेपर्यंत रंगला. दर्गा सरपंच अब्दुल अजीज मुतवल्ली, बाळासाहेब मिरजकर, मोहसीन मिरजकर, मजीद सतारमेकर यांनी संयोजन केले. संगीत सभेस श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला.