सांगली : संपर्काचे, माहितीचे सर्वाधिक उपयोगाचे साधन म्हणून ज्या मोबाईलचा वापर केला जातो, त्याचे साईडइफेक्टस् आता दिसू लागले आहेत. मोबाईल व संगणकावर इंटरनेटच्या माध्यमातून अल्पवयीन मुले-मुली अश्लील संकेतस्थळांकडे आकर्षित होत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर व विटा शहरात १० ते १९ वयोगटातील तीनशे मुला-मुलींचे सर्वेक्षण करण्यात आले. ‘मोबाईल, इंटरनेटचा वापर आणि मुले’ असा सर्वेक्षणाचा विषय होता. इंटरनेटचा वापर, आवड-निवड, संकेतस्थळांचा शोध, सोशल साईटस्चा वापर आदी विषयांवर सर्वेक्षण करण्यात आले. दररोज इंटरनेट वापरणारे ४३ टक्के आढळून आले. केवळ करमणुकीसाठी इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ३४ टक्के इतकी आहे. मोबाईल आता सहजासहजी खरेदी करण्यासारखी वस्तू झाल्याने कमी वयातच मोबाईल व इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याची बाब दिसून आली. स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांचीही संख्या अल्पवयीन मुला-मुलींमध्ये वाढल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)सोशल नेटवर्किंगची एक्स्प्रेस...सोशल नेटवर्किंग साईटस्च्या वापराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुला-मुलींनी याप्रती असलेले आपले प्रेम व्यक्त केले. सोशल नेटवर्किंगची एक्स्प्रेस सुसाट सुटल्याचे चित्र सर्वेक्षणातून पुढे आले. अशा नेटवर्किंग साईटस्च्या वापर करणाऱ्या मुला-मुलींची संख्या ७३ टक्के इतकी आहे. कधीच वापर न करणाऱ्यांची संख्या ११ टक्के, तर सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण ७ टक्के मुलांनी सांगितले. सोशल नेटवर्किंग साईटस्चा वापर किंवा हे पोर्टल काय आहेत, हे समजतच नसल्याची बाब ९ टक्के मुला-मुलींनी स्पष्ट केली. हॉट गर्ल्सचा शोध इंटरनेटवर अश्लील साईटस् पहात नसल्याचे ६६ टक्के मुला-मुलींनी सांगितले. त्याचवेळी ३४ टक्के मुला-मुलींनी अशा साईटस् पहात असल्याचे स्पष्टपणे सांगितले. यामध्ये सर्वाधिक शोध ‘हॉट गर्ल्स’ या शब्दाच्या माध्यमातून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. याची संख्या ११ टक्के आहे. तितकीच टक्केवारी पोर्न स्टार सनी लिआॅनच्या चित्रफिती व छायाचित्रे पाहणाऱ्यांची आहे. पिंक ब्युटीचा शोध घेणाऱ्यांची संख्या ५ टक्के, तर ‘शांती’ ही पोर्न साईट पाहणाऱ्यांची संख्या ७ टक्के इतकी आहे. दररोज इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ४३ टक्केदररोज इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. इंटरनेटच्या वापराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ४३ टक्के मुलांनी दररोज इंटरनेट वापराबाबत होकार दर्शविला. आठवड्यातून एकदा वापरणाऱ्यांची संख्या ७ टक्के, कारण असेल तेव्हाच वापरणाऱ्यांची संख्या २५ टक्के, तर कधी कधीच इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या २५ टक्के इतकी आहे. इंटरनेटचा वापर नेमका कशाकशासाठी होतो ?इंटरनेटचा वापर करणाऱ्या मुला-मुलींनी दिलेल्या माहितीनुसार याचा सर्वाधिक वापर गाणी, व्हिडिओ डाऊनलोडिंगसाठी तसेच गेम खेळण्यासाठी केला जातो. याचे प्रमाण ३४ टक्के आहे. शाळेच्या प्रोजेक्टसाठी वापर करणारे ३२ टक्के, चॅटिंगसाठी वापर करणारे ९ टक्के, तर विविध संकेतस्थळ (वेबसाईटस्) पाहणारे २५ टक्के आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापासूनही वापरमोबाईल व इंटरनेट कधीपासून वापरण्यास सुरुवात केली, या प्रश्नाला उत्तर देताना अनेक धक्कादायक उत्तरे मिळाली. वयाच्या दहाव्या वर्षापासून मोबाईल व इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ४ टक्के आहे. १२ ते १५ व्या वर्षी वापर करणाऱ्यांची संख्या २0, तर १५ ते १९ या वयोगटात याचा वापर करणाऱ्यांची संख्या ७६ टक्के आहे. मोबाईल व इतर ठिकाणांहून सहज उपलब्ध होणाऱ्या इंटरनेट सुविधेमुळे अश्लील चित्रफीत पाहणे सहज उपलब्ध होते. मुले अशा चित्रफिती अगदी शौचालये, अभ्यासाची खोली असेल तर त्याठिकाणी किंवा रात्री उशिरा सर्व झोपले असताना हा साईटस् पाहतात. नंतर त्यांना अशा साईटस्ची सवयच लागून जाते. याचे परिणाम त्यांच्या मानसिकतेवर व आरोग्यावर होतात. अभ्यासाकडेही दुर्लक्ष होते. हे थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन व्हायला हवे. प्राध्यापक, शिक्षकांनीही सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. पालकांनी नेहमी त्याचा मोबाईल तपासून पाहिला पाहिजे. त्याचे मित्र कोणते, कोणत्या नेट कॅफेमध्ये जातो, मोबाईलमध्ये कोणत्या साईटस् डाऊनलोड केल्या आहेत, याची माहिती घेऊन त्याचा मित्र बनून त्याला मार्गदर्शन केले पाहिजे. त्याला अपमानास्पद वागणूक देऊन प्रश्न मिटणार नाहीत, याची दक्षता घेतली पाहिजे. - प्राचार्य संभाजी बामणे
अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले
By admin | Updated: July 8, 2014 00:45 IST