शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्याची बैठक ऑफलाईन,मग महासभा ऑनलाईन का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST

सांगली : महापालिकेच्या सभागृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होते. मग पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन का? असा ...

सांगली : महापालिकेच्या सभागृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होते. मग पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन का? असा सवाल सत्ताधारी भाजपसह विरोधी नगरसेवकांतून विचारला जात आहे. पुन्हा एकदा ऑनलाईन सभेवरून प्रशासन विरुद्ध नगरसेवक असा कलगी तुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेची महासभा २० जानेवारीला होत आहे. यावेळीही नगरसचिव कार्यालयाने ऑनलाईन सभा घेतली आहे. गत डिसेंबर महिन्यातही ऑनलाईन सभेवरून बराच गदारोळ झाला होता. महापौरांनी ही सभा तहकुब करावी लागली होती. त्यानंतर नगरविकास मंत्रालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले. नगरविकास मंत्रालयाने स्थायीसह विषय समितीच्या बैठका ऑफलाईन घेण्यास मंजुरी दिली, पण महासभेचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला. त्यामुळे तहकूब सभा ऑनलाईन घेण्याची वेळ आली होती.

आता पुन्हा ऑनलाईन सभेवरून कलगी तुरा सुरू झाला आहे. भाजपचे सहयोगी सदस्य नगरसेवक गजानन मगदूम यांनी ऑनलाईन सभेला विरोध केला आहे. गतआठवड्यात नगरविकास खात्याचेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका सभागृहात आढावा बैठक झाली. या बैठकीला ३०० हून अधिकजण उपस्थितीत होते. नगरविकास मंत्र्यांची बैठक ऑफलाईन होत असेल तर महासभा का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनीही ऑनलाईन सभा न घेता ऑफलाईनच घ्यावी, अशी भूमिका घेतली आहे. पण नगरसचिव कार्यालयाने नियमावर बोट ठेवत ऑनलाईनच सभा होईल, असे स्पष्ट केल्याने प्रशासन विरूद्ध नगरसेवक असा संघर्ष वाढणार आहे.