शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री, नेतेही भ्रूणहत्येला जबाबदार

By admin | Updated: March 9, 2017 23:46 IST

पृथ्वीराज पाटील : शासकीय समित्यांमधील हस्तक्षेपामुळे हत्याकांडाला बळ

सांगली : प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा जिल्हा सल्लागार समितीच्या कारभारात हस्तक्षेप करणारे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि याप्रकरणी हस्तक्षेप करणारे संबंधित भाजप नेते हेच स्त्रीभ्रूण हत्याकांडास जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्वांची सखोल चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी गुरुवारी काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, खिद्रापुरेच्या कारनाम्याबद्दल २९ एप्रिल २0१६ रोजी निनावी फोनद्वारे तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी सत्ताधारी गटातीलच एका नेत्याच्या सांगण्यावरून खिद्रापुरेस क्लीन चिट देण्यात आली. यापूर्वी गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा सल्लागार समिती अस्तित्वात होती. अ‍ॅड. अर्चना उबाळे यांचा या समितीत समावेश होता. त्यांनी अत्यंत धडाडीने अनेक ठिकाणी छापे टाकून पंधरा गुन्हे उघडकीस आणले होते. डॉ. राम कुलकर्णी आणि डॉ. राम लाड यांचाही या गुन्हा दाखल झालेल्या लोकांमध्ये समावेश होता. तरीही त्यांना क्लीन चिट देण्यात आली. त्यांना कोणत्या आधारावर व कोणाच्या सांगण्यावरून अभय देण्यात आले, याची चौकशी करायला हवी. चौकशी अहवालात रुग्णालयामधील सापडलेल्या नोंदी, हत्यारे, संशयास्पद साहित्य यांचा उल्लेख होता. तरीही क्लीन चिट देण्यात आली. खिद्रापुरे व त्याच्या सहकाऱ्यांनाही अशाचप्रकारे दोषमुक्त केले जाऊ शकते, अशी शंका नागरिकांमध्ये आहे. अ‍ॅड. उबाळे यांचे काम चांगले असतानाही तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका पत्राद्वारे त्यांना कार्यमुक्त केले. आजअखेर या समितीवर त्यांची जागा भरण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकार स्त्रीभ्रूण हत्येच्या विषयावर किती गंभीर आहे, याची कल्पना येते. एकूणच काळीमा फासणाऱ्या या घटनेला सरकारही तितकेच जबाबदार आहे. सरकारने पारदर्शीपणाचा डांगोरा पिटण्यापेक्षा या घटनेतील दोषी असणाऱ्या संबंधित मंत्र्यांचीही चौकशी लावण्याचे धाडस दाखवावे, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)