शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मिरज पूर्व भागात खनिजाची लूट

By admin | Updated: March 7, 2016 00:13 IST

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांचा आरोप

अण्णा खोत --मालगाव -: मिरज पूर्व भागातील सिध्देवाडी परिसरात महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गौण खनिजाची लूट सुरु आहे. परवान्यापेक्षा जादा उत्खनन करुन मुरुमाची वाहतूक करणारे एजंट गब्बर बनत असल्याचे चित्र आहे. मुरुमाच्या ओव्हरलोड वाहतुकीने रस्ते दुभंगल्याने मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन व वाहतूक करणाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे परिसरातून मोठ्या प्रमाणात बेकायदा मुरूमाचे उत्खनन होत असल्याचे चित्र आहे.शहरात घरबांधकामाच्या भरावासाठी मुरुमाची मोठी मागणी आहे. वाढत्या मागणीमुळे मुरुम पुरवठादार एजंटांचे पीक आले आहे. मुरुम उत्खननासाठी सध्या सिध्देवाडी परिसर हा प्रमुख केंद्र बनला आहे. शहरातील बड्या एजंटांनी स्थानिक एजंटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पडजमिनींचा शोध घेऊन मुरुमाचे उत्खनन सुरु केले आहे. या उत्खननावर नियंत्रण असणाऱ्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एजंटांना अभय असल्याने, नावाला परवाना काढून दिवस-रात्र उत्खनन करुन लाखो रुपयांच्या मुरुमाची लूट सुरु आहे. स्थानिक महसूलच्या अधिकाऱ्यांकडून जेथे मुरुम उत्खनन सुरु आहे, त्या ठिकाणाची व परवान्याची तपासणीही केली जात नाही. परिसरातील बेकायदा मुरुम उत्खननाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडून एजंटांची पाठराखण केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. महसूल विभागाचा आशीर्वाद असल्याने गेल्या दोन वर्षात जुजबी कारवाईपलीकडे कोणतेच कठोर पाऊल उचललेले नसल्याने, मुरुमाचे अवैध उत्खनन करुन एजंटांनी पर्यावरणालाही आव्हान दिले आहे. एकूणच या साऱ्या प्रकारांची चौकशी करून अवैध गौणखनिजाचे उत्खनन रोखावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.ओव्हरलोड वाहतूक : रस्ते दुभंगलेसिध्देवाडी परिसरात मुरुमाच्या ओव्हरलोड वाहतुकीचा फटका गावालगतच्या प्रमुख रस्त्यांना बसला आहे. दंडोबा रस्ता ते खण फाटा व सिध्देवाडी ते कळंबी फाटा या रस्त्यावरुन मुरुमाची वाहतूक सुरु आहे. वाहतुकीसाठी कमी क्षमतेच्या या रस्त्यावरुन सहाचाकीबरोबरच दहाचाकी वाहनांच्या ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी निरुपयोगी झाले आहेत. वर्षभरापूर्वी डांबरीकरण केलेल्या सिध्देवाडी ते खण फाटा या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकडे संबंधित विभागाचेही दुर्लक्ष असल्याने, रस्त्यांवर होणारा खर्चही वाया जात आहे.उत्खनन परवान्यातही गोलमाल!मुरुम उत्खननासाठी शेतकऱ्याची जमीन कराराने घेतली जाते. ज्या शेतजमिनीतील किती ब्रासचा मुरुम उत्खनन करावयाचा आहे, त्याचा महसुली कर भरुन (रॉयल्टी) परवाना घ्यावा लागतो. सध्या या परवान्यातही गोलमाल सुरु आहे. जुन्या परवान्याच्या नावाखाली दुसऱ्या गटातील जमिनीच्या मुरुमाचे उत्खनन करुन शासनाचा महसूल बुडविण्याचाही उद्योग सुरु असताना, महसूल विभागाचे त्याकडेही दुर्लक्ष असल्याने, एजंटांना कारवाईचे भय उरलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर सुरु असलेल्या गौण खनिज उत्खननाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.