शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

तासगावमध्ये बक्षीस योजनेतून लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 23:42 IST

तासगाव : अवघ्या पाचशे रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास लाखो रुपयांची वस्तू बक्षीस म्हणून देण्याचे आमिष दाखवून तासगाव येथील श्री साई एंटरप्रायजेसने शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.सोमवारी शेवटचा ड्रॉ असल्याने अनेक ग्राहक तासगावात आले होते. मात्र हा ड्रॉ काढण्यापूर्वीच कंपनीचे चालक पसार झाल्याचे लक्षात ...

तासगाव : अवघ्या पाचशे रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास लाखो रुपयांची वस्तू बक्षीस म्हणून देण्याचे आमिष दाखवून तासगाव येथील श्री साई एंटरप्रायजेसने शहरासह तालुक्यातील शेकडो नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.सोमवारी शेवटचा ड्रॉ असल्याने अनेक ग्राहक तासगावात आले होते. मात्र हा ड्रॉ काढण्यापूर्वीच कंपनीचे चालक पसार झाल्याचे लक्षात आले. लाखो रुपयांचा गंडा घालून पोबारा केल्याने संबंधित ग्राहकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची चर्चादेखील आहे. तासगाव येथे काही महिन्यांपासून सरस्वतीनगरमध्ये आॅफिस थाटून ही कंपनी सुरू करण्यात आली होती. या कंपनीचे चालक आणि कंपनीसाठी काम करणारे एजंट बहुतांश परजिल्ह्यांतीलच होते.या कंपनीच्या माध्यमातून एजंटांनी ग्रामीण भाग पिंजून काढला होता. शंभर रुपयांत सभासद करून पुढील काही महिने ठराविक दिवसांनी लकी ड्रॉ काढायचा. त्यामध्ये नाव आलेल्या सभासदाला चारचाकी, दुचाकी वाहन, ट्रॅक्टरसह हजारो रुपयांच्या अनेक महागड्या वस्तू, सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. पहिल्या पाच सोडतींसाठी ४९९ रुपये, तर नंतरच्या सहा सोडतींसाठी ८९९ रुपयांचा हप्ता भरायचा होता. इतक्या कमी रकमेत अनेक महागड्या वस्तू स्वस्तात मिळणार, या आमिषाने अनेक लोक बळी पडले.या कंपनीच्या पहिल्या लकी ड्रॉची सोडत २ एप्रिल २०१८ ला झाली होती, तर शेवटची सोडत २७ आॅगस्टला होणार होती. त्यानुसार सोमवारी या योजनेत सभासद झालेले अनेक ग्राहक तासगाव येथे आले. कंपनीच्या संचालकांनी सांगितल्यानुसार शहरातीलच एका कार्यालयात उपस्थित राहिले; मात्र या ठिकाणी कपंनीचा कोणताच प्रतिनिधी दिसला नाही. त्यामुळे आलेल्या ग्राहकांनी सरस्वतीनगर येथे कंपनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र या ठिकाणी कार्यालय गुंडाळून कंपनीच्या सर्वच प्रतिनिधींनी पोबारा केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तालुक्यातील अनेक गावातील ७८ लोकांनी लेखी तक्रार दिली आहे. मात्र घोटाळ्याची व्याप्ती यापेक्षा मोठी असून, याहीपेक्षा अनेक लोकांना गंडा बसला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.ग्राहकाला आठ हजार रुपयांना चुनास्वस्तात मस्त वस्तू घेण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या ग्राहकांत सामान्य लोकांचांच जास्त भरणा आहे. ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचून लोकांना भुरळ पाडून गेल्या सहा महिन्यांपासून महिन्याला ठराविक रकमेचे हप्ते गोळा करण्याचे काम राजरोसपणे सुरू होते. कंपनीच्या नियमानुसार आठही सोडतीत मोठे बक्षीस लागले नाही, तरीदेखील बक्षीस न लागलेल्या ग्राहकांना फ्रीजचे हमखास वाटप होणार होते. त्यामुळे अनेक ग्राहक सहज गळाला लागले. सुमारे आठ हजार रुपये प्रत्येक ग्राहकाकडून कंपनीकडे भरण्यात आले होते. आता कंपनीच्या प्रतिनिधींनी पोबारा केल्याने प्रत्येक ग्राहकाला आठ हजार रुपयांचा चुना लागला आहे.