शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरात तरुणांचा मध्यरात्री धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST

सांगली : चिंचणी यात्रेला जाताना अडविलेल्या २५ घोडागाड्या व सुमारे ८०० दुचाकीस्वारांनी सांगली शहरात मंगळवारी मध्यरात्री धिंगाणा घातला. घोड्यांच्या ...

सांगली : चिंचणी यात्रेला जाताना अडविलेल्या २५ घोडागाड्या व सुमारे ८०० दुचाकीस्वारांनी सांगली शहरात मंगळवारी मध्यरात्री धिंगाणा घातला. घोड्यांच्या शेपटीला इलेक्ट्रिक शॉक देत, त्यांना जखमी करून कर्णकर्कश हॉर्न वाजवीत या तरुणांनी शहरभर नागरिकांच्या झोपा उडविल्या. याचे व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाले. पीपल्स फॉर ॲनिमल संघटनेने या व्हिडिओंची चौकशी करून संबंधित तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

मंगळवारी रात्री एक वाजता चिंचणी यात्रेतून घोडागाडी पळवीत आणणाऱ्या सांगलीच्या पश्चिम भागातील सुमारे ८०० तरुणांनी सांगली शहरात धिंगाणा घातला. या टोळीला कागवाड येथे कर्नाटक सीमेवर रोखण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांना कागवाड पोलिसांनी मज्जाव केल्याचे समजते. त्यानंतर ते घोडागाड्यांसह सांगलीच्या दिशेने धावले. विश्रामबाग येथे पोलीस गाडी असल्याचे समजल्यानंतर ही टोळी शंभरफुटी रोडला वळली. पत्रकारनगर, भावे नाट्यगृहाच्या बोळातून हे लोक बायपास रस्त्यावर घुसले. शिवशंभो चौकात काही लोकांना पोलिसांनी पाहिल्याचेही समजते. घोडागाडी पळवताना हे लोक घोड्यांना शॉक देत होते. शंभरफुटी व सांगलीच्या पत्रकारनगरातील अनेक लोक या दंग्यामुळे जागे झाले. त्यांना हा प्रकार लक्षात आला नाही.

पीपल्स फॉर ॲनिमल संघटनेचे अध्यक्ष अशोक लकडे यांनी कागवाडपर्यंत मंगळवारी रात्री अशा हुल्लडबाजांवर वॉच ठेवला होता. काही तरुणांना कागवाड सीमेवर अडवून परत पाठविल्याचे त्यांना दिसून आले. मात्र, सांगलीतील घटनेबाबत त्यांना कल्पना नव्हती. त्यांनी यासंदर्भातील चित्रीकरणे संकलित केली आहेत. संघटनेच्या प्रमुखांना पाठवून याबाबत ते तक्रार करणार आहेत.

कोट

मागील वर्षीही आम्ही अशा प्रकाराबाबत पोलीस मुख्यालयात तक्रार केली होती. त्याची दखल पोलिसांनी घेतली नाही. घोड्यांचा छळ करीत हे हुल्लडबाज दरवर्षी असा गोंधळ घालतात. बुधवारी सोशल मीडियावर आलेले व्हिडिओ व चौकांमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून कारवाई करावी.

- अशोक लकडे, अध्यक्ष पीपल्स फॉर ॲनिमल, सांगली