शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी रस्त्यांची पावसाळ्यानंतर दुरूस्ती

By admin | Updated: September 1, 2014 23:09 IST

प्रमोद शेटके : उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन

कुपवाड : मिरज औद्योगिक वसाहतीमधील खराब झालेल्या रस्त्याप्रकरणीची फेरनिविदा प्रक्रिया लवकरच राबविली जाणार असून पावसाळा झाल्यावर या खराब रस्त्याची दुरूस्ती करण्यात येईल, असे अश्वासन औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता प्रमोद शेटके यांनी आज उद्योजकांना दिले.मिरज औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर या औद्योगिक वसाहतीमध्ये एक रूपयाचा निधीही खर्च झाला नाही. त्यामुळे उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मिरज औद्योगिक वसाहतीला भेट दिली होती. त्यावेळी राणे यांनी रस्त्यासह गटारी व पथदिव्यासाठी निधी देण्याविषयीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांच्या आश्वासनानंतर औद्योगिक विकास महामंडळाकडून रस्त्याची नऊ कोटीची निविदाही काढण्यात आली होती. निविदेच्या प्रक्रियेची मागील महिन्यात वर्षपूर्तीही झाली होती. तरीही औद्योगिक विकास महामंडळाकडून या खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती केली जात नव्हती. त्यामुळे उद्योजक नाराज झाले होते. अखेर आज सांगली मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, संजय खांबे, माधव कुलकर्णी, सागर पाटील यांच्या नेतृत्वाखालील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता शेटके यांची भेट घेऊन पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यांनीही उद्योजकांच्या विनंतीला प्रतिसाद देऊन मिरज एमआयडीसीमधील खराब रस्त्यांची पाहणी केली. रस्त्यांची पाहणी केल्यावर त्यांनी लवकरच फेरनिविदेची प्रक्रिया राबविण्याविषयी मत स्पष्ट करून पावसाळ्यानंतर रस्त्याची दुरूस्ती करण्याचे अश्वासन दिले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातील खड्डयामध्ये मुरूमही भरून देण्याची मागणी उद्योजकांनी केली. यावेळी विजय जेरे, उपकार्यकारी अभियंता मलाबादे, सुबोध नागमोती, गणेश निकम आदी उद्योजक उपस्थित होते. (वार्ताहर)