शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी कार्यालय स्थलांतर रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाचे सांगलीतील विभागीय कार्यालय सोलापूरला हलविण्याबरोबरच हा जिल्हा कोल्हापूरला जोडण्यासाठी बुधवारी मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. या निर्णयाविरोधात सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, वसंतदादा औद्योगिक वसाहत आणि गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत या संघटनांनी संतप्त भूमिका घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री व उद्योग ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाचे सांगलीतील विभागीय कार्यालय सोलापूरला हलविण्याबरोबरच हा जिल्हा कोल्हापूरला जोडण्यासाठी बुधवारी मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. या निर्णयाविरोधात सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, वसंतदादा औद्योगिक वसाहत आणि गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत या संघटनांनी संतप्त भूमिका घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांना हा निर्णय रद्द करण्यासाठी साकडे घातले आहे. तसेच उद्योग विकास आघाडी या संघटनेने या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे तीव्र पडसाद जिल्हा उद्योग मित्रच्या बैठकीवरही पडणार आहेत.जिल्ह्यात औद्योगिक महामंडळाच्या क्षेत्राची स्थापना १९७३ च्या दरम्यान झाली. त्यावेळेपासून या जिल्ह्यातील उद्योजकांना कोल्हापूर विभागीय कार्यालयात कामासाठी हेलपाटे घालावे लागत होते. त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तत्कालिन उद्योगमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी २००० मध्ये सांगलीतील विश्रामबागमध्ये या जिल्ह्याबरोबरच सोलापूरसाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू केले. ते आजतागायत सुरू आहे. याठिकाणी येण्यासाठी सोलापूरच्या उद्योजकांना नाहक त्रास होत असल्याच्या कारणावरून पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी हे कार्यालय सोलापूरला हलविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मुंबईत मंत्रालयात बुधवारी, १३ सप्टेंबर रोजी ११ वाजता बैठक बोलाविली आहे.याप्रकरणी सर्वप्रथम ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर उद्योजकांतून या निर्णयाबद्दल संतप्त पडसाद उमटले. या निर्णयाविरोधात उद्योग विकास आघाडी या उद्योजक संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि पालकमंत्री यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उद्योग आघाडीचे अध्यक्ष डी. के. चौगुले, मनोज भोसले, जफर खान आदी उद्योजकांनी दिला आहे. तसेच सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स या दोन्ही संघटनांनी संतप्त भूमिका घेतली आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांसह, खासदार, आमदार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना साकडे घातले आहे, अशी माहिती मिरज असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, उपाध्यक्ष विनोद पाटील, संचालक हेमंत महाबळ, माधव कुलकर्णी आणि कृष्णा व्हॅली चेंबरचे कुटुंबप्रमुख शिवाजी पाटील, अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष रमेश आरवाडे व पांडुरंग रूपनर यांनी दिली आहे.याबरोबरच याप्रकरणी वसंतदादा औद्योगिक वसाहत, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत आणि लघु उद्योग भारती या संघटनांनी तीव्र आंदोलनाची तयारी दर्शविली आहे.या जिल्ह्यात सोलापूरपेक्षा अधिक औद्योगिक क्षेत्र आहे. तसेच भविष्यात होणाºया महामार्गामुळे उद्योगक्षेत्र वाढेल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे कार्यालय स्थलांतरित करू नये; तसेच कोल्हापूरलाही हे कार्यालय जोडू नये, अशी उद्योग संघटनांची मागणी आहे. याचे तीव्र पडसाद जिल्हा उद्योग मित्रच्या बैठकीवरही पडणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.‘लोकमत’चे अभिनंदन...सांगलीतील एमआयडीसीचे कार्यालय कोणत्याही परिस्थितीत स्थलांतरित करू देणार नाही. हा निर्णय झाल्यास प्रगतीपथावर असलेला जिल्हा बॅकफूटवर जाणार आहेत. उद्योग विकास आघाडी याप्रश्नी रस्त्यावर उतरणार आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी आघाडी जिवाचे रान करेल. प्रथम एमआयडीसीच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार आहोत. त्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहोत, असे उद्योग विकास आघाडीचे अध्यक्ष डी. के. चौगुले यांनी सांगितले. अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल चौगुले यांच्यासह सर्वच उद्योजकांनी ‘लोकमत’चे अभिनंदन केले.