शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’चे सव्वादोन कोटी वसूल

By admin | Updated: February 13, 2016 00:26 IST

आवर्तनाची साशंकता कायम : थकबाकी भरण्यासाठी शेतकरी सरसावला

सांगली : म्हैसाळ योजनेच्या आवर्तनाविषयी निर्माण झालेला थकबाकी वसुलीचा तिढा सुटण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे. सांगलीच्या वसंतदादा व कवठेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्यांनी प्रत्येकी एक कोटी दिल्यानंतर आतापर्यंत २ कोटी २६ लाखांची वसुली झाली आहे. दरम्यान, शासनाने ठरवून दिलेल्या पाच कोटींचा टप्पा पार करण्यास अजून वसुलीची गरज असल्याने अजून तरी आवर्तन सुरू होण्याची शक्यता नाही. मात्र, आता शेतकऱ्यांनीच पुढाकार घेत वसुलीस प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील ‘त्या’ भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने आवर्तन सुरू करण्याची मागणी वाढत असताना गेल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे, पैसे भरले तरच पाणी सोडण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आता वसुलीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर उशिरा का होईना वसंतदादा कारखाना व महांकाली कारखान्याने प्रत्येकी एक कोटीची रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरल्याने थकबाकीचा आकडा बऱ्यापैकी कमी आला आहे. त्यात पाटबंधारे विभागाने आतापर्यंत २२ लाखांची वसुली केली होती.शुक्रवारी लिंगनूर येथून ३ लाख रुपये थकबाकीपोटी भरण्यात आले आहेत, तर ‘क्रांती’चे अध्यक्ष अरुणअण्णा लाड यांनी वैयक्तिक एक लाखाची मदत केली आहे. अशी शुक्रवारअखेर २ कोटी २५ लाख ६६ हजार ५६९ रुपयांची वसुली झाली आहे. आता आवर्तन सुरू होण्याची शक्यता टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांनीही थकबाकी भरण्यास सुरुवात केल्याचे दिलासादायक चित्र आहे. वसुली अशीच कायम राहिल्यास आठवडाभरात पाणी सुटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी) अरुण लाड यांचे एक लाख; अवधूत ट्रेडर्सचे दोन हजारथकबाकी भरण्यासाठी ‘म्हैसाळ’च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. याचवेळी ‘म्हैसाळ’शी अर्थाअर्थी संबंध नसणाऱ्या कुंडल येथील अवधूत ट्रेडर्सच्यावतीने दोन हजार रुपयांचा धनादेश शुक्रवारी ‘पाटबंधारे’कडे जमा करण्यात आला. रक्कम छोटी असली तरी त्यांनी दाखविलेल्या आस्थेचे मोल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याचा धडा घेत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनीही वसुलीस प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले. आजच अरुणअण्णा लाड यांनीही जाहीर केल्याप्रमाणे वैयक्तिक एक लाख रुपयांचा धनादेश जमा केला आहे. योजनेशी काहीही संबंध नसताना लाड व अवधूत ट्रेडर्स यांनी दाखविलेल्या या औदार्याची जोरदार चर्चा आहे.