शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

‘म्हैसाळ’प्रश्नी मुख्यमंत्र्यांचीही नकारघंटा

By admin | Updated: February 5, 2016 01:08 IST

मुंबईत चर्चा : दोन टप्प्यात पाच कोटी भरण्याचा तोडगा

मिरज : शेतकऱ्यांनी पैसे भरल्याशिवाय म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. मिरज पूर्व भागातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने खासदारांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, ‘म्हैसाळ’चे पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र, पाच कोटी दोन टप्प्यांत शेतकऱ्यांनी भरल्यास ‘म्हैसाळ’चे पाणी सोडण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. खा. संजय पाटील, खंडेराव जगताप, भारत कुंडले, साहेबराव जगताप, तानाजी पाटील, गंगाराम तोडकर, यांच्यासह मिरज पूर्व भागातील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मिरज पूर्व भागासह तीन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. थकित पाणीपट्टीसाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आले नसल्याने द्राक्ष व फळबागा उद्ध्वस्त होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होणार आहे. शेतकरी पाणीपट्टी भरण्यास तयार असल्याने योजनेचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांनी किमान पाच कोटी रुपये भरल्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यापैकी अर्धी रक्कम तरी भरा, तरच पाणी सोडण्यात येईल. टंचाई निधीतून पैसे भरले जाणार नाहीत. पैसे भरल्याशिवाय पाणी सोडायचे असते, तर यापूर्वीच सोडले असते, असे स्पष्टपणे सांगितले. शेतकऱ्यांकडून पाच कोटी जमा होत नसतील, तर सुरुवातीला अडीच कोटी व पाणी सुरू झाल्यानंतर अडीच कोटी भरावेत, असा तोडगा मुख्यमंत्र्यांनी सुचविला. ‘म्हैसाळ’च्या पाण्याअभावी शेतकरी अडचणीत आल्याचे खासदारांनी सांगितल्यानंतर, गेल्यावेळी ‘म्हैसाळ’ची दोन आवर्तने सोडण्यात आली, मात्र शेतकऱ्यांनी पैसे भरले नाहीत. आतापर्यंत ११ आवर्तने सोडण्यात आली आहेत. आता शेतकऱ्यांना पाण्यासाठी पैसे भरण्याची सवय होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सुनावले. ‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी एकरी पाच हजार रुपये शेतकऱ्यांनीभरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र त्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही. आतापर्यंत केवळ २२ लाख रूपये जमा झाले आहेत. पाणी सोडल्यानंतरच पाणीपट्टी भरू, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेतून पाणी मिळणे कठीण आहे. ‘म्हैसाळ’च्या पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक असून दि. ९ रोजी मिरज पूर्व भागातील २८ गावांत बंद पाळून दि. १२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.