शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळच्या अद्ययावत स्मशानभूमीने लक्ष वेधल

By admin | Updated: January 10, 2015 00:16 IST

नागरिकांत समाधान : अंत्यविधीसाठी कट्टे, मुंडण शेडची व्यवस्थो

सुशांत घोरपडे- म्हैसाळ -म्हैसाळ (ता. मिरज) येथील स्मशानभूमी जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांत स्मशानभूमीची वानवा असताना, ही स्मशानभूमी सर्वसुविधांनी युक्त असल्याने नागरिकांतून व अंत्यविधीसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांतून समाधान व्यक्त होत आहे.या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी तीन कट्टे, तर पावसापासून संरक्षणासाठी शेडची व्यवस्था, दहाव्या दिवशी मुंडण कार्यक्रमासाठी मुंडण शेड व पाण्याच्या टाकीची व्यवस्था, त्याचबरोबर जवळपास शेकडो झाडांची लागवड व नागरिकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीतून पाणी आणण्यासाठी पायऱ्यांची सोय केली आहे. स्मशानभूमीजवळ पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील महिलांनी पाठपुरावा करून ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. मनोरमादेवी शिंदे यांनी पुढाकार घेऊन नवा आदर्श घालून दिला. या कामासाठी गावातील सत्ताधारी गटाचे नेते मनोज शिंदे यांनी प्रयत्न करून निधी आणला. ग्रामसेवक एल. ए. सनदी, सरपंच वैशाली सुतार, उपसरपंच परेश शिंदे यांचे याकामी सहकार्य लाभले.रक्षा झाडांच्या बुंध्यालारक्षाविसर्जनानंतर रक्षा नदीमध्ये सोडण्याऐवजी या रक्षा झाडांच्या बुंध्याला घालण्याचा नवा उपक्रम ग्रामपंचायतीच्यावतीने सुरू करण्यात आला आहे.रक्षाविसर्जनानंतर रक्षा नदीत सोडल्यामुळे पाण्यातील प्रदूषण वाढते. हे प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही या नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे व नागरिकांमधूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.- परेश शिंदे-म्हैसाळकर, उपसरपंच, म्हैसाळ