शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेचे दहा लाख भरले

By admin | Updated: March 17, 2016 00:18 IST

जत तालुक्यातील शेतकरी सरसावले : पाणी तात्काळ सोडण्याची मागणी

-जत : तालुक्याच्या उत्तर भागाला वरदार ठरणारी म्हैसाळ योजना चालू करण्यासाठी शेगाव, कुंभारी, गुळवंची, वाळेखिंडी, कोसारी, रेवनाळ, बनाळी येथील शेतकऱ्यांनी थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सुमारे १० लाख रुपयांची थकबाकी जमा केली आहे. शेगाव (ता. जत) येथील जय सहकार पाणी वापर संस्थेच्या शेतकऱ्यांनी ३ लाख २१ हजार रुपयांचा धनादेश आ. विलासराव जगताप यांच्याहस्ते व म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीत म्हैसाळचे पाणी सोडावे, या मागणीने जोर धरला आहे. विविध संघटनांनी आंदोलनेही केली. मात्र शासनाने थकबाकी भरल्याशिवाय पाणी सोडणार नाही, ही भूमिका घेतली. आ. जगताप यांनी शासनाची भूमिका शेतकऱ्यांना समजण्यासाठी जत उत्तर भागात शेगाव येथे लाभक्षेत्रातील १८ गावांची बैठक घेतली. या बैठकीत थकबाकी भरण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार शेगाव येथील साठवण तलाव क्रमांक १ ची थकबाकी ३ लाख २३ हजारपैकी ३ लाख २१ हजारांची रक्कम शेतकऱ्यांनी जमा केली. ही रक्कम आ. जगताप यांच्याहस्ते म्हैसाळ योजनेचे उपविभागीय अभियंता शंकर शिंदे यांच्याकडे प्रदान केली. दरम्यान, कुंभारी येथील तलाव क्रमांक १ क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांनी १ लाख ५७ हजारांची रक्कम, तर कोसारी तलावाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी २ लाख रुपयांचा धनादेश काढून अधिकाऱ्यांकडे जमा केला आहे. दरम्यान, गुळवंची, वाळेखिंडी कार्यक्षेत्रातील थकबाकी भरण्यास शेतकरी पुढे येत असून, दोन लाखांपर्यंत रक्कम जमा होत आहे, तर शेगाव साठवण तलाव क्रमांक २ च्या लाभक्षेत्रातील शेगाव व बनाळी येथील शेतकऱ्यांनी ३ लाख रुपये जमा केले आहेत. एकूणच जत उत्तर भागातील शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेच्या थकबाकीतील रक्कम भरण्यासाठी पुढाकार घेतल्याने या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी येण्याची आशा निर्माण झाली आहे. थकबाकी भरण्यास शेतकऱ्यांची मानसिकता तयार होत असल्याने पाणी लवकरच मिळणार आहे. त्यामुळे भागात पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार आहे. धनादेश देताना शेगाव साठवण तलाव क्रमांक १ चे पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी लक्ष्मण बोराडे, सचिन बोराडे, आर. डी. शिंदे, सुभाष पाटील, शहाजी गायकवाड, अशोक शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)