शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ भ्रुणहत्याप्रकरणी आणखी एकाला अटक

By admin | Updated: March 15, 2017 15:37 IST

गर्भपाताशी संबंधित औषधे कृष्णा नदीत फेकून दिल्याचेही निष्पन्न

म्हैसाळ भ्रुणहत्याप्रकरणी आणखी एकाला अटकसांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रुण हत्याप्रकरणात बुधवारी मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला औषध पुरविणाऱ्या भरत नावाच्या आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तो मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून सध्या सांगलीतील बसस्थानक परिसरात रहात होता. दरम्यान, खिद्रापुरे याने रुग्णालयातील गर्भपाताशी संबंधित औषधे कृष्णा नदीत फेकून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. म्हैसाळ भ्रुण हत्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत या प्रकरणात मुख्य संशयित खिद्रापुरे याच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. यात दोन डॉक्टर, चार एजंट, नर्स, कंपाऊंडर, औषध पुरवठा करणाऱ्या इसमाचा समावेश आहे. मणेराजुरीतील विवाहिता स्वाती जमदाडे हिचा गर्भपातावेळी मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. तिच्या पती प्रविण जमदाडे यालाही अटक झाली आहे. त्याच्याकडून बुधवारी मोटारसायकल जप्त करण्यात आली. भ्रुणहत्येचे प्रकरण समोर येताच खिद्रापुरे गायब झाला होता. फरारी होताना त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील औरवाड परिसरात रुग्णालयातील गर्भपाताशी संबंधित औषधे फेकल्याची कबुली दिली आहे. खिद्रापुरे याला औषध पुरविणाऱ्या आणखी एकाचे नाव समोर आले असून त्याला अटक करण्यात आली. अटक केलेल्यांची संख्या बारा झाली आहे. भरत हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून सध्या तो सांगलीत राहतो. त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)