शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याचा पारा गेला ४१ अंश सेल्सिअसवर

By admin | Updated: April 11, 2017 00:18 IST

जिल्हा तापला : तापमानात वाढ होण्याचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज; शहरातील मुख्य रस्त्यांवर अघोषित संचारबंदीचे चित्र

सांगली : जिल्ह्याच्या तापमानात सोमवारी अचानक वाढ होऊन पारा ४१ अंशांवर गेला आहे. त्यामुळे वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार, किमान तापमानातही वाढ होत आहे. सांगली जिल्ह्याच्या तापमानात यंदा विक्रमी नोंदीची चिन्हे दिसू लागली आहेत. एप्रिल महिन्यातील आजवरच्या सरासरी तापमानापेक्षा सोमवारी नोंदले गेलेले तापमान ३ अंश सेल्सिअसने अधिक आहे. १९७३ मध्ये सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आजपर्यंत हा विक्रम अबाधित आहे. या विक्रमाच्या जवळपास पारा घुटमळत असल्याने, वाढलेल्या तापमानाची चिंता आता सतावत आहे. सांगली जिल्ह्यात मार्च महिन्यातही अधिक तापमानाची नोंद झाली होती. एप्रिल आणि मे महिन्यातील तापमानाला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे सांगलीसह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर अघोषित संचारबंदीसारखे चित्र दिसू लागले आहे. उन्हापासून बचावासाठी विविध उपाय नागरिकांकडून केले जात आहेत. सोमवारी कमाल तापमान ४१ अंश नोंदले गेले असून, किमान तापमान २३ अंशावर गेले आहे. १६ एप्रिलपर्यंतच्या तापमानाचा अंदाज व्यक्त करताना भारतीय हवामान खात्याने पारा चाळीसच्या आसपासच घुटमळणार असल्याचे म्हटले आहे. येत्या काही दिवसात आकाश निरभ्र राहणार असून, पावसाचीही शक्यता नसल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. (प्रतिनिधी)वाऱ्याचा वेगही आता मंदावल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. हवामानविषयक विविध संकेतस्थळांनी नोंदविलेल्या निरीक्षणानुसार सोमवारी वाऱ्याचा वेग प्रतितास दहा किलोमीटर इतका नोंदला गेला आहे.एप्रिलमधील आजवरचे विक्रम...तारीखतापमान१४ एप्रिल १९७३४३१६ एप्रिल २0१६४२.७१0 एप्रिल २0१३४२.४२७ एप्रिल २00७४१.३