शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी दोन हात करणाऱ्यांसमोर मानसिक आरोग्याचेच आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:26 IST

सांगली : कोरोनाचा वाढता कहर आणि त्याच्या नियंत्रणासाठी पोलीस, आरोग्य यंत्रणा अहाेरात्र झटत आहे. ‘फ्रंटलाईन वर्कर’मध्ये या घटकाची भूमिका ...

सांगली : कोरोनाचा वाढता कहर आणि त्याच्या नियंत्रणासाठी पोलीस, आरोग्य यंत्रणा अहाेरात्र झटत आहे. ‘फ्रंटलाईन वर्कर’मध्ये या घटकाची भूमिका महत्त्वाची असलीतरी त्यांनाही सततच्या कामामुळे येणाऱ्या ताणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांना पुरेशी ड्युटी देण्यात येत आहे. आराेग्य कर्मचाऱ्यांनाही मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचे आव्हान आहे.

रस्त्यावरील गर्दी कमी करण्याबरोबरच प्रतिबंधित क्षेत्राची अंमलबजावणी, संचारबंदी, लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. अगदी कोविड सेंटर,लसीकरण केंद्रावरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठीही पोलीस काम करतात. सततच्या आणि आव्हानात्मक बनलेल्या कामामुळे या कर्मचाऱ्यांना सतत मानसिक तणावाखाली रहावे लागत आहे.

सुरुवातीला बंदोबस्ताचा ताण असलातरी आता पोलिसांना ठराविक वेळेचीच ड्युटी देण्यात आली आहे. याशिवाय नियमित आरोग्य तपासणीही घेतली जात आहे. पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी स्वत: अधिकारी त्यांच्या कामाचे कौतुक करत आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित वेळेपेक्षा सरासरी दोन तास जादा काम करावे लागत असलेतरी त्यांनाही मानसिक ताणतणावापासून दूर ठेवण्यासाठी सलग सुटी, कुटुंबासाठी जादा वेळ देऊन मदतच केली जात असलेतरीही मानसिक आरोग्याचे आव्हान कायम आहे.

चौकट

कुटुंब आणि नोकरी सांभाळण्याची कसरत

कोट

नेहमीच रस्त्यावर अथवा प्रत्यक्ष कोविड सेंटरसमोर ड्युटी असल्याने कुटुंबातील सदस्य चिंतेत असतात. त्यामुळे ताण वाढत असलातरी प्रत्यक्ष काम करताना काहीही वाटत नाही. उलट आम्हाला त्याचा आनंदच आहे.

पोलीस कर्मचारी

कोट

गर्दी रोखण्यासाठी काम सुरू केले की आम्हालाच त्रास होतो तरीही आमची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ड्युटी पॉईंटही बदलले जात आहेत. त्यामुळे दिलासा वाटतो.

पोलीस कर्मचारी

कोट

आशा वर्कर्स म्हणून आम्ही काम करताना, कोरोनाबाधितांच्या घरापर्यंत जावे लागते. काम जोखमीचे असलेतरीही आम्ही करत आहे. संसर्ग होणार नाही याची काळजी घेतो मात्र, कितीही केलेतरी तणाव हा असतोच.

आरोग्य कर्मचारी

कोट

लसीकरण आणि चाचणीसाठी रुग्णालयात गर्दी वाढत आहे. त्यामुळे ताण वाढत आहे. मानसिकदृष्ट्या सुरुवातीला खूप त्रास झाला आता आवश्यक ती खबरदारी घेऊन काम करत आहोत.

आरोग्य कर्मचारी

कोट

आरोग्य विभागातील प्रत्येक घटकाला सध्या ताण असलातरी सकारात्मक मानसिकता ठेवावी लागणार आहे. प्रशासनाकडूनही प्रयत्न करत आहोत. सुरू असलेल्या सुमपदेशन केंद्राचाही उपयोग होत आहे.

डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक

कोट

पोलिसांची पूर्ण काळजी

सध्या सततचा बंदाेबस्ताचा पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना ताण असलातरी तो कमी करण्यासाठी नियाेजन केले आहे. लक्षण असलेल्या कर्मचाऱ्यांना लगेच उपचार सुरू केले जात आहेत त्यामुळे इतरांची मानसिकता चांगली राहत आहे. पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक

कोट

सर्वांचीच मानसिकता आवश्यक

कोरोनाचा संसर्ग आणि त्यावरील उपाययोजना करणाऱ्या पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यासह इतर सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची मानसिकता महत्त्वाची आहे. पुरेशी झोप, आजूबाजूचे चांगले वातावरण, योग्य आवडी निवडी व कुटुंबाशी नाळ कायम ठेवल्यास ताणतणाव कमी होऊ शकतो.

पूनम गायकवाड, मानसोपचारतज्ज्ञ