शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील क्रांतिसिंहांचे स्मारक राज्यात अव्वल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:24 IST

हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे रविवारी खानापूर व कडेगाव मराठी साहित्य परिषद आणि क्रांतिवीर भगवानराव पाटील जन्मशताब्दी समितीच्या वतीने देण्यात ...

हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे रविवारी खानापूर व कडेगाव मराठी साहित्य परिषद आणि क्रांतिवीर भगवानराव पाटील जन्मशताब्दी समितीच्या वतीने देण्यात येणारा क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील (बप्पा) सामाजिक पुरस्कार उस्मानाबाद येथील पुरोगामी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते धनंजय पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आ. मोहनराव कदम, आ. अनिल बाबर, क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील, नाशिकचे स्वातंत्र्यसेनानी सांगळे बाबा, प्रा. डॉ. बाबूराव गुरव, संपतराव पवार उपस्थित होते.

धनंजय पाटील म्हणाले, दिल्लीला लाखो शेतकरी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करीत आहेत. त्यातील शेकडो मृत्युमुखी पडले आहेत. परंतु, सरकार त्यांची दखल घेत नाही. हे विदारक चित्र यापुढील काळात बदलले पाहिजे.

आ. अनिल बाबर यांनी भगवानराव पाटील यांचे स्वातंत्र्यलढ्यातील व त्यानंतरचेही सामाजिक आणि राजकीय योगदान सांगून क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांचा गौरव केला. राष्ट्रपती शौर्य पदक मिळाल्याबद्दल मुंबई पोलीस सेवेतील जीवन जाधव यांचाही सत्कार झाला.

अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मुंबई येथील क्रांतिसिंह नाना पाटील भाजी मंडईचे अध्यक्ष शंकरराव पाटील, अ‍ॅड. अविनाश देशमुख, प्रा. विलासराव पाटील, सुभाष पवार, प्रकाश यादव, चंद्रकांत देशमुखे, रघुराज मेटकरी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सदानंद माळी, उत्कर्ष पाटील, किमया पाटील, आदी उपस्थित होते. सागर पाटील यांनी आभार मानले.

फोटो - १४०२२०२१-विटा-क्रांतिसिंह पुरस्कार : हणमंतवडिये येथे भाई भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते भाई धनंजय पाटील यांना प्रदान करण्यात आला. यावेळी डावीकडून अ‍ॅड. सुभाष पाटील, सौ. पाटील, भाई संपतराव पवार, आ. अनिल बाबर, आ. मोहनराव कदम उपस्थित होते.