शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

स्मारक जाळपोळ; चौघांना कोठडी

By admin | Updated: June 15, 2014 00:22 IST

संशयितांना शुक्रवारी उगारखुर्द (ता. अथणी) येथे अटक

सांगली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या स्मारकात जाळपोळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चौघांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या आठवड्यात जाळपोळीची ही घटना घडली होती. संशयितांना शुक्रवारी उगारखुर्द (ता. अथणी) येथे अटक केली होती. नीतेश व्हराळे, अमनदीप कांबळे, किरण बेळकुंडे, प्रीतम जयकर या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. फेसबुकवर राष्ट्रपुरुषांची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर संशयितांनी कोल्हापूर रस्त्यावर जाऊन एसटी बसवर दगडफेक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एवढ्या रात्री तिकडे कशाला जायचे, असा विचार करुन त्यांनी सावरकरांच्या स्मारकात जाळपोळ करण्याचा ठरविले. त्यानुसार सोमवारी रात्री त्यांनी जाळपोळ केली होती. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांसह दुर्मिळ ग्रंथ-पुस्तके, सावरकरांचे वैचारिक वाड्मय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रचार पुस्तके अशी दीड हजारावर ग्रंथसंपदा जळून खाक होऊन दोन लाखांचे नुकसान झाले होते. अत्यंत गुंतागुंत व आव्हानात्मक बनलेल्या या प्रकरणाचा छडा लावण्याचे शहर पोलिसांसमोर आव्हान होते; मात्र बसवर दगडफेक केल्याप्रकरणी अटक केलेल्या मारुती व्हराळे याच्या चौकशीतून स्मारक जाळपोळीचे धागेदोरे मिळाले आणि चार संशयितांना अटक करण्यात यश आले होते. त्यांना आज (शनिवार) दुपारी पोलीस बंदोबस्तात न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना १७ जूनपर्यंत (चार दिवस) पोलीस कोठडी सुनावली. सायंकाळी त्यांची सांगलीच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. (प्रतिनिधी)