शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

झाल्या नाहीत बैठका, पण इतिवृत्त तयार!

By admin | Updated: January 10, 2015 00:35 IST

वाळवा पंचायत समिती सभा : रुग्णसेवेचा बोजवारा

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्ण कल्याण समितीच्या बैठका न होताच त्याचे इतिवृत्त तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार आज (शुक्रवारी) पंचायत समिती सभेत उघड झाला. सभापती रवींद्र बर्डे यांनी या इतिवृत्तांताची सत्यता तपासण्याचे आदेश दिले. दरम्यान, तालुक्यातील अपंग व्यक्तींना अपंगत्वाचे दाखले देण्यासाठी तालुकास्तरावर शिबिर घेण्याची मागणी सदस्यांनी केली.पंचायत समिती सभागृहात सभापती बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी उपसभापती भाग्यश्री शिंदे, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, राहुल रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर, वाळव्याचे दत्तात्रय शेळके यांच्यासह पॅरिस, पेशावरमधील हल्ल्यातील मृतांना आदरांजली वाहण्यात आली. आरोग्य विभागाच्या चर्चेवेळी वाळव्याच्या तपश्चर्या पाटील, लालासाहेब अनुसे (बावची) यांनी, प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्ण कल्याण समितीच्या बैठकाच होत नसल्याचा आरोप केला. त्यावर आरोग्य अधिकारी डॉ. अशोक सुतार यांनी, बैठका झाल्याचे इतिवृत्त आपल्याकडे आहे, असे सांगितले. सौ. पाटील यांनी, वाळवा केंद्रात दीड वर्षापासून बैठकच झाली नसल्याचा मुद्दा लावून धरला. त्यावर सभापती बर्डे यांनी, बैठक न होताच इतिवृत्त कसे तयार झाले अशी विचारणा करुन या इतिवृत्तांताची सत्यता तपासण्याचे आदेश दिले. नेर्ले आरोग्य केंद्रात शिपाई नसल्याची तक्रार सुभाष पाटील यांनी केली. तसेच तेथील बांधकाम का बंद आहे, अशी विचारणा राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद जयकरराव नांगरे— पाटील यांनी केली.लालासाहेब अनुसे यांनी, बावची येथील शाळेस मुख्याध्यापक आणि शिक्षक नाहीत अशी तक्रार केली. त्यावर गटशिक्षणाधिकारी छायाताई माळी यांनी, मुख्याध्यापकाचे पद मंजूर आहे. मात्र शिक्षक पदास मंजुरी नसल्याचे सांगितले. सुभाष पाटील यांनी, शाळांमधील स्वच्छतेच्या सुविधांवर बोट ठेवले. नळ आहे, पण पाणी नाही, स्वच्छतागृहे वापरायोग्य नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली. प्रकाश पाटील यांनी, पेठ शाळेच्या क्रीडांगण विकासासाठी ठराव करुन घेतला. सौ. माळी यांनी मांडलेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या सत्कार योजनेस बर्डे यांनी मान्यता दिली. प्रकाश पाटील यांनी, पेठनाका बसथांब्यावर सुविधा द्या अशी मागणी केली. पं. स. कार्यालयात विरोधी सदस्यांना स्वतंत्र दालन उपलब्ध करुन द्या असे म्हणताच, सभापती बर्डे यांनी आमचे कक्ष, अंतर्कक्ष सर्वांसाठी खुले असून तेथे बसा, असे सांगितले. (वार्ताहर)प्रवासी मार्गाचा लिलावयेत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे खासगीकरण करणारे विधेयक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवासी मार्गाचा लिलाव निघेल. यामध्ये एसटीवर बेकारीची वेळ येणार आहे. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसणार असल्याचे बसस्थानक व्यवस्थापक पी. एल. कांबळे यांनी सांगितल्यावर संपूर्ण सभागृहाने त्याला विरोध करण्याची भूमिका जाहीर केली.