शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आशा वर्कर्सच्या प्रश्नांवरील मुंबईतील बैठक निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST

एडिटोरियलवर : आशा वर्कर्सच्या प्रश्नांवर मुंबईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली. बैठकीस राज्यातील आशा वर्कर्स ...

एडिटोरियलवर : आशा वर्कर्सच्या प्रश्नांवर मुंबईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली. बैठकीस राज्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्या वेतनवाढीसंदर्भात राज्य शासन सध्या आर्थिक भार सोसण्याच्या मानसिकतेत नाही, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी मुंबईतील बैठकीत केले. त्यामुळे राज्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांचा संप यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला.

राज्यात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांचा १५ जूनपासून राज्यव्यापी संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कृती समितीच्या नेत्यांबरोबर मुंबईत बैठक घेतली.

यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करीत आहेत. त्या दररोज सात ते आठ तास काम करतात. त्यांना अत्यंत कमी वेतनावर राबवून घेतले जाते. त्यांना जगण्यासाठी किमान वेतन द्यावे, कोरोनासंबंधित कामाच्या मोबदल्यामध्ये वाढ द्यावी, ३०० रुपये प्रतिदिन याप्रमाणे विशेष भत्ता द्यावा, आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना प्राधान्य देण्यात यावे, आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गटप्रवर्तकांचे सुसूत्रीकरण करावे आदी मागण्या करण्यात आल्या.

यावर टोपे म्हणाले की, राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असून, आता कोणताही आर्थिक बोजा सहन करण्याची सरकारची परिस्थिती नाही. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे शक्य नाही व कोरोनाकाळातील मोबदल्यात वाढ करणे शक्य नाही.

संप मिटविण्याकरता कोणताही प्रस्ताव त्यांनी कृती समितीच्या नेत्यांसमोर मांडला नाही, त्यामुळे संप यापुढेही चालू ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला.

बैठकीस अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, आशा कर्मचारी व गटप्रवर्तक कृती समितीचे नेते एम. ए. पाटील, डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, श्रीमंत घोडके, सुवर्णा कांबळे आदी उपस्थित होते.