कसबे डिग्रज : कृष्णा व वारणा नद्यांच्या महापुराने शेतकरी, छोटे व्यावसायिक व पाणीपुरवठा संस्थांचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय नुकसानभरपाईबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कसबे डिग्रज सोसायटीमध्ये शुक्रवार, दि. १३ ऑगस्टला एक वाजता बैठक बोलविण्यात आली आहे.
मिरज, वाळवा, पलूस, कडेगाव या तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकरी, पाणीपुरवठा योजनांचे पदाधिकारी, सरपंच, प्रमुख लोकप्रतिनिधी, आदी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी, कर्जमाफी मिळावी यावर चर्चा होणार आहे. तसेच कसबे डिग्रज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव नलवडे, कवठेपिराणचे उपसरपंच भीमराव माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यावेळी कसबे डिग्रज सोसायटी अध्यक्ष रमेश काशीद, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. बाळासाहेब मासुले, माजी पंचायत समिती सदस्य अजित आपटे, आदी उपस्थित होते.